पंतप्रधान नरेद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या वेळी ठाण्यात त्यांनी अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. मेट्रो मार्गिका ३ ला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. रविवार पासून ही मेट्रो सेवा सुरु होत आहे. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘महिलांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीपासून सावध राहावं. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा काँग्रेसला देशाच्या विकासापासून काय अडचण आहे असा सवाल केला जात होता. पण सत्तेतून बाहेर पडल्यावर काँग्रेसचा रंग दिसत आहे. काँग्रेसला आता अर्बन नक्षलींची गँग चालवत आहे. काँग्रेस सरकार बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. अपयश आल्यानंतरही ते स्वप्न पाहत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं एकच मिशन आहे. समाजात दुफळी निर्माण करा. लोकांना वेगळं करा आणि सत्ता काबीज करा. आपल्याला भूतकाळातून धडा घ्यायचा आहे. आपल्या एकतेला ढाल करायची आहे. आपल्यात फूट पडली तर आपल्यात फूट पाडणारे मैफल साजरी करतील. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं स्वप्न धुळीस मिळवा. काँग्रेसने देशाला गरीबीत ढकललं आहे. काँग्रेसने महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं. त्यांनी ज्या राज्यात सरकार बनलं त्या राज्यांना उद्ध्वस्त केलं.’
मोदी म्हणाले की, ‘त्यांच्यासोबत राहून इतर पक्षही बर्बाद होत आहे. जे आधी राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगूलचालन करत आहे. आम्ही वक्फ बिल आणलं. पण लांगूलचालून करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवीन चेले आम्हाला विरोध करत आहे. वक्फच्या अवैध जमिनी घेऊ देणार नाही, असं ते म्हणत आहे. वीर सावरकारांवर काँग्रेस टीका करते. तेव्हाही काँग्रेसचे चेले त्यांच्या पाठी उभे राहत आहे. काँग्रेस म्हणते जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू. पण काँग्रेसच्या चेलांची बोलती बंद आहे. नवीन व्होट बँकेसाठी विचारधारेचं एवढं पतन, काँग्रेसची अशी हुजरेगिरी, काँग्रेसचं भूत ज्याच्या अंगात जातं त्याची हीच अवस्था होते.’
‘काँग्रेस अनेक वर्षापासून हेच करत आले आहे. यांनी महाराष्ट्रात आतापासून रंग दाखवला सुरु केले आहे. लाडकी बहीण योजना सुरु केली आणि तीन एलपीजी सिलेंडर मोफत दिले. हे त्याला पचवू शकत नाहीत. यांना जर सत्ता मिळाली तर हे शिंदेंवर राग काढतील. त्यांचया सर्व योजना बंद करुन टाकतील. लोकांना पैसा मिळू नये पण त्यांच्या दलालांना पैसे मिळो. काँग्रेसचा रंग आता समोर आला आहे. भारताला पुढे जाण्यापासून ते रोखत आहेत. काँग्रेस लोकांना वाटण्याचं काम करते आणि सत्तेत येतात. आपल्याला यातून धडा घेतला पाहिजे. आपण एक राहिले पाहिजे. आपण वाटलो गेलो तर ते मैफील सजवतील. महाविकासाघाडीच्या प्रयत्नाना आपण यशस्वी होऊ देऊ नये. यांनी देशाला गिरीबीत धडकलले. शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. यांच्या संगतीत येऊन इतर पक्ष पण बर्बाद होतात. वक्फ बोर्ड बिलवर हे लोकं विरोध करत आहेत. वीर सावकरांचं हे लोकं अपमान करतात. तरी इतर पक्ष त्यांच्या मागे उभे राहतात. काँग्रेस म्हणते कलम ३७० परत आणणार. तरी हे गप्प बसतात. आज देशाला, महाराष्ट्राला एक इमानदार सरकारची गरज आहे. हे काम फक्त महायुती सरकार करु शकते.’