महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजीनगरमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी ओवैसी आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ओवैसी छत्रपती संभाजी नगर. कोणाचा बाप पैदा झाला तरी हे नाव आता बदलू शकत नाही. एमआयएमच्या सभेत एका महिलेने म्हटले. हा संभाजी राजे कोण होता. हे संभाजीनगर कसे झाले. औरंग्या फितुरी झाली नसती तर कधीच संभाजी महाराज तुझ्या हाती लागले नसते.’
‘महायुतीच्या सरकारने संभाजी महाराज यांचं नाव या शहराला दिले. आता आम्ही जागे झालो आहोत. आता व्होट जिहाद सुरु झालाय. लोकसभेच्या निवडणुकीत हे पाहायला मिळालं. योगींनी आपल्याला सांगितले बटेंग तो कटेंगे. मोदींनी ही सांगितलं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे. संभाजीनगर २३ तारखेला देखील भगवाच असेल हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे. काही लोकांनी भगव्यासोबत गद्दारी सुरु केली. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला संभाजीनगर नाव दिलं. पण अलीकडच्या काळात काही नेत्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायला लाज वाटते. ही निवडणूक एकजूट दाखवण्याची निवडणूक आहे. असं ही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, ‘प्रत्येक घरात आपण आता पाणी पोचवणार आहोत. कचऱ्याची समस्या असेल किंवा रस्त्यांची अडचण असेल आपण ते सोडवले आहेत. आपण समृद्धी महामार्ग तायर केले. इथे सेन्द्रा या ठिकाणी डीएमयसी सुरू केली आणि देशातील सगळ्या प्रमुख कंपन्या या संभाजीनगरमध्ये आणल्या आहेत. हजारो लोकांचा रोजगार आपण तयार करत आहोत. एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक संभाजीनगरमध्ये होणार आहे.’
‘विमानतळाला आंतराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी धाव पट्टी वाढवण्यासाठी 140 कोटी रुपये आपण दिले. समुद्राला वाहून जाणारे पाणी 54 टीएमसी गोदावरी पत्रात आणून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार आहोत. नवीन क्रीडा विद्यापीठ आपण स्थापन करणार आहोत, आंतराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम संभाजीनगर ला तयार होत आहे. सिडकोचे प्लॉट लीज होल्डचे फ्री होल्डचे केले आहेत. 35 हजार कुटुंबाना सिडको प्लॉटची मालकी आपण देत आहोत.’
’11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या आता 1 कोटी लखपती दीदी तयार करणार आहोत. लेक लाडकी योजना सुरू केली, लेक घरी आली नव्हे तर प्रत्यक्ष लक्ष्मी घरी आली असं वाटलं पाहिजे. मुलींचे मामा मंत्रालयात बसले आहेत ते मुलींच्या शिक्षणाचा खर्च आपलं सरकार करत आहे, मुलींना मोफत शिक्षण देत आहोत.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.