“लहान मासे, मोठे मासे यात प्रश्न नाही. आम्ही यात राजकारण करु इच्छित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली, लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला. तो कोणालातरी पाठिशी घालण्यासाठी, या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालाय तो दडपण्यासाठी, आमचा विरोध लढा त्यासाठी आहे. कोटयवधी रुपयांच काम टेंडरच्या माध्यमातून काढल्यानंतर प्रत्यक्षात काम 2O ते 25 लाखात आटपलं. मंजूर झालेला खर्च, झालेलं काम ही तफावत पाहिली तर म्हणून तो पुतळा इतक्या कमी प्रतीचा झाला” असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
“या राज्यात कसलाही भ्रष्टाचार होऊ शकतो. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने लूट करतय. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत. काल दुष्काळी भागांचा दौरा केला. तिथले रस्ते वाहून गेलेत, तिथे तरुण कार्यकर्त्यांची घर वाहून गेलीत. त्यांनी आमच्यासमोर कागदपत्र ठेवली. ग्रामीण भागातील रस्त्यांची काम गुजरातच्या ठेकेदारांना दिली. ते रस्ते वाहून गेले. सरस्वती कंस्ट्रक्शन ही गुजरातची कंपनी आहे. परभणी, हिंगोलीच्या रस्त्यांची काम गुजरातच्या ठेकेरदारांनी दिली” असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात तरुण मुलं, इंजिनिअर्स नाहीयत का? असा सवाल राऊत यांनी विचारला.
‘त्यांनी पायही जमिनीला लावला नाही’
“गुजरातच्या ठेकेदारांनी ग्रामीण भागात बनवलेले रस्ते वाहून गेले. आदित्य ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर सरकारला जाग आली. कृषमंत्री कुठे होते? या राज्यात कृषी मंत्री आहे की नाही? आदित्य ठाकरे येणार आहे म्हटल्यावर कृषी मंत्री काही ठिकाणी गेले. ते गाडीतून उतरले नाहीत, असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे. त्यांनी पायही जमिनीला लावला नाही” असं संजय राऊत म्हणाले.