रात्र झाली तरी पालकांचा शाळेत ठिय्या; महागडी पुस्तके आणि वाढीव फीविरोधात पालक आक्रमक

| Updated on: Jul 15, 2021 | 12:33 AM

या सरकारच्या आदेशाला हरताळ फासत फी वाढ तर केलीच आणि त्यावर हुकूम मॅकमीलन पब्लिकेशनची महागडी पुस्तके घेण्याची सक्तीदेखील पालकांना केल्याने पालक हतबल झालेत.

रात्र झाली तरी पालकांचा शाळेत ठिय्या; महागडी पुस्तके आणि वाढीव फीविरोधात पालक आक्रमक
फोटो प्रातनिधिक
Follow us on

ठाणेः कोरोनाच्या थैमानाने आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्यांना शाळांनी देखील वेठीस धरल्याची असंख्य उदाहरणे आपण आत्तापर्यंत पाहिलीत. परंतु हजारोंची महागडी पुस्तके पालकांच्या माथी मारण्याचा अजब प्रकार दिवा येथील SMG विद्यालयात पाहायला मिळाला. सदर शाळेने कोरोना काळात फी वाढ करू नये, या सरकारच्या आदेशाला हरताळ फासत फी वाढ तर केलीच आणि त्यावर हुकूम मॅकमीलन पब्लिकेशनची महागडी पुस्तके घेण्याची सक्तीदेखील पालकांना केल्याने पालक हतबल झालेत. (Parents stay at school even if it is night; Parents aggressive against expensive books and increased fees)

विकास पब्लिकेशनची स्वस्त पुस्तके रद्दबातल करत पालकांची पिळवणूक

आतापर्यंत चलनात असलेल्या नवनीत किंवा विकास पब्लिकेशनची स्वस्त पुस्तके रद्दबातल करत पालकांची पिळवणूक सुरू केली. नवनीत आणि विकास पब्लिकेशनची पुस्तके केवळ 1200 रुपयांना मिळत असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तब्बल 5500 रुपयांची मॅकमीलन पब्लिकेशनची पुस्तके घेण्याची सक्ती शाळा प्रश्नाने केल्याने पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यात कहर म्हणजे सदर पुस्तके दिवा स्थानकाजवळील प्रोमोशन नावाच्या दुकानातूनच घ्यावीत, अशी देखील सक्ती पालकांवर करण्यात आली. यातून शाळेचे सदर पब्लिकेशन आणि दुकानाशी असलेले आर्थिक लागेबांधे स्पष्ट होतात. शाळेच्या या मनमानीविरोधात पालकांनी जून 2021 या एकाच महिन्यात तीन वेळा आंदोलनं केली. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने ही आंदोलने मागे घेण्यात आली.

फीमध्ये 15 % सवलत देत मॅकमीलन पब्लिकेशन रद्द केल्याची तोंडी घोषणा

अखेर 30 जून रोजी शाळेचे व्यवस्थापक स्वप्नील गायकर यांनी फीवाढ मागे घेत वर फीमध्ये 15 % सवलत देत मॅकमीलन पब्लिकेशन रद्द केल्याची तोंडी घोषणा केली. परंतु काही दिवसातच आपल्या निर्णयावर घूमजाव केले. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी आज शाळेत ठिय्या आंदोलन केले. रात्र झाली तरीही पालक हटत नसल्याचे लक्षातच आल्याने पोलिसांनी पालकांना घरी जाण्याचे आवाहन केले व त्याचे पालन न केल्यास अटकेची धमकी देखील दिली. आपली मागणी रास्त असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यात लक्ष देऊन पालकांना न्याय द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला.

संबंधित बातम्या

फी दरवाढीला विरोध अंगाशी, विद्यार्थ्याचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवलीतील शाळेचा प्रताप

…तर नागरिकांचा उद्रेक होईल, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

Parents stay at school even if it is night; Parents aggressive against expensive books and increased fees