सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc exma)घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (judge) परीक्षेत अनेकांनी खडतर परीश्रमानंतर चांगले यश मिळवले आहे. मग राजकारणातून न्यायव्यवस्थेकडे जाणाचा पराक्रम करणारी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मळद येथील ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) असो की सोलापूर जिल्ह्यातील (solapur) स्नेहा असो.
ज्या मुलीचे वडील आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकत होते, ती मुलगी आता न्यायाधीश होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत स्नेहा सुनील पुळुजकर हिला यश मिळाले आहे. स्नेहा यांचे वडील सुनील पुळुजकर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आहेत. तिची आई उज्ज्वला या जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका आहे.
मुलींना केले शिक्षित
सुनील व उज्ज्वला यांनी त्यांचा संसार भाड्याच्या घरातच सुरू. त्यांना सुजित, सुयश व स्नेहा ही तीन मुले आहेत. त्यांनी स्वत:चे घर घेण्यापेक्षाही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मुलगा सुजित बंगळूर येथे स्वॉफ्टवेअर अभियंता आहे. सुयश सोलापूर न्यायालयात वकिली करत आहे.आता स्नेहा न्यायाधीश झाली आहे.
स्नेहाने मिळवले सुवर्णपदक
स्नेहाचे शिक्षण सोलापूर येथील सेवासदन प्रशाले झाले. दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान केले. त्यानंतर ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी, दयानंद लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. सोलापूर विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवत एल. एल. एम. पूर्ण केले. आई-वडील नोकरीला गेल्यावर घरातील कामे करून स्नेहा स्वत: अभ्यास करत होते. परीक्षेसाठी रोज दहा ते बारा तास अभ्यास केल्याचे स्नेहा सांगते. परीक्षेत मुलाखत हा महत्वाचा टप्पा होता. मुलाखतीत इतर विषयांसोबत सोलापूरसंदर्भात प्रश्न विचारले.
माझी इच्छा मुलीने केली पुर्ण
कारण आम्ही क्लास वन अधिकाऱ्यांचे जीवन जवळून पाहिले आहे. यामुळे माझी इच्छा होती की मुलीने क्लास वन अधिकारी व्हावे. ती स्नेहाने पुर्ण केली, अशी तिची आई उज्ज्वला हिने सांगितले.