इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

| Updated on: May 06, 2021 | 5:11 PM

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकर महाराजांविरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय.

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
इंदोरीकर महाराज
Follow us on

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं दिलासा दिलाय. मात्र, इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकर महाराजांविरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 8 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. (Petition filed in the Aurangabad Bench of the High Court against Indorikar Maharaj)

या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता. त्यानंतर आता अंनिसने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत अंनिसने इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केलंय. अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ही माहिती दिली आहे.

संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा

लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचे अपील मंजूर केले. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात त्यांनी अपील केले होते. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

संबंधित बातम्या :

मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य भोवलं, इंदोरीकर महाराजांवर गुन्हा

Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!

Petition filed in the Aurangabad Bench of the High Court against Indorikar Maharaj