ठाणे : ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार 5 फेब्रुवारी, 2022 ते सोमवार 7 फेब्रुवारी, 2022 पर्यंत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक(Megablock) घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणून सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवे(Bus Service)चा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. (Planning of additional bus services from Thane Municipal Corporation’s transport service during megablocks
रेल्वे विभागाकडून शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी, 2022 रोजी रात्रौ 1.30 वाजल्यापासून ते सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी रात्रौ 1.30 वाजेपर्यत 72 तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी 10 मिनिटांच्या प्रस्थानांतराने आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा स्टेशन या मार्गावर 15 मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात 205 बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मेगाब्लॉकमुळे 350 लोकल आणि लांब पल्ल्याच्या 117 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेलपर्यंत चालविण्यात येणार आहेत. 5 फेब्रुवारीच्या रात्री 11.10 वाजल्यापासून सहा फेब्रुवारीच्या पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण येथून सुटमाऱ्या अप मेल एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. 6 फेब्रुवारीपासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि नवीन बोगदा एक मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालवल्या जातील. (Planning of additional bus services from Thane Municipal Corporation’s transport service during megablocks)
इतर बातम्या
TMC Commissioner : ठाण्यातील रस्ता रुंदीकरण कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी