मुंबई : वारकरी संप्रदायासाठी तसेच दळणवळण सोपे होण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य मंत्र्यांची उपस्थिती होती. भूमिपूजनाच्या सोहळ्यात तब्बल 12,294 कोटी रुपयांचे 574 किलोमीटर लांबीच्या तेरा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आणि लोकार्पण करण्यात आले. या भूमीपूजन सोहळ्याची आज (8 नोव्हेंबर) चांगलीच चर्चा झाली असून तो नेमका कसा आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे.
♦ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (NH-985)
♦ मोहोळ ते वाखरी रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज एक)- रस्त्याची लांबी : 44.70 किमी तर किंमत 1438 कोटी रुपये
♦ वाखरी ते खुडूस रस्त्याचे चौपदरीकरण ((पॅकेज दोन) – रस्त्याची लांबी:33.10 किमी तर किंमत 979 कोटी रुपये
♦ खुडूस ते धर्मपुरी रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज तीन) – रस्त्याची लांबी: 39.20किमी तर किंमत: 1154 कोटी रुपये
♦ धर्मपुरी ते लोणंद रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज चार) – रस्त्याची लांबी 49.40 किमी. तर किंमत 1412 कोटी रुपये
♦ लोणंद ते दिवेघाट रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज पाच) -रस्त्याची लांबी 54.50 किमी तर किंमत 1710 कोटी रुपये
♦ संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-985G)
♦ पाटस ते बारामती रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज 1)- रस्त्याची लांबी : 41.36 किमी तर किंमत 1343 कोटी रुपये
♦ बारामती ते इंदापूर रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज दोन) रस्त्याची लांबी 42.13 किमी तर किंमत 1471 कोटी रुपये
इंदापूर ते तोंडसे रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज तीन)- रस्त्याची लांबी: 46.70 किमी तर किंमत 1601 कोटी रुपये
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण झालेल्या काही रस्त्यांचे लोकार्पण केले. त्याची माहिती खालीलप्रमाणे
♦ म्हसवड-पिलीव पंढरपूर रत्याचे पुनर्विकास व उन्नतीकरण- रस्त्याची लांबी : 53.08 किमी तर किंमत : 263 कोटी रुपये
♦ कुर्डुवाडी ते पंढरपूर रस्त्याचे पुनर्विकास व उन्नतीकरण- रस्त्याची लांबी: 48.37 किमी तर किंमत: 212 कोटी रुपये
♦ पंढरपूर ते सांगोला रस्त्याचे पुनर्विकास व उन्नतीकरण- रस्त्याची लांबी : 31.15 किमी तर किंमत: 177 कोटी रुपये
♦ टेंभूर्णी ते पंढरपूर रस्त्याचे उन्नतीकरण- रस्त्याची लांबी : 36.19 किमी तर किंमत: 112 कोटी रुपये
♦ पंढरपूर-मंगळवेढा-उमदी रस्त्याचे उन्नतीकरण- रस्त्याची लांबी 54.33 किमी तर किंमत 422 कोटी रुपये
♦ विठ्ठल भक्तांसाठी दोन्ही बाजूंनी सुरक्षित आणि सुलभ पदपथ तयार करण्यात येणा आहे. (पालखी मार्ग)
♦ पंढरपूर आणि पुणे यांची आधुनिक चौपदरी राष्ट्रीय महामार्गाद्वारे जोडणी केली जाणार
♦ सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशीरस, पंढरपूर, बारामती, बावडा, अकलुज आणि श्रीपूर-बोरगाव येथे दाट लोकवस्तीला बाह्यवळण.
♦ पुणे ते पंढरपूर प्रवासाच्या वेळेत 2 तासांची बचत, प्रदुषणात घट
♦ कृषीमाल आणि स्थानिक उत्पादनाकरीता मोठ्या बाजारपेठेत जाण्यासाठी सुलभ मार्गाची उपलब्धी
♦ पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना
इतर बातम्या :
VIDEO: पंढरपूरला भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री
कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू नका, नंदुरबारच्या पालकमंत्र्यांचे विद्युत कंपन्यांना आदेश
(pm modi addressing lay foundation stone of palkhi marg know all about palakhi road its budget usefulness)