मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं आहे. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे. मोदी या कार्यक्रमानंतर अंधेरी पूर्वतील मरोळ येथील दाऊदी बोहरी समाजाच्या अल जामिया तुस सफिया या युनिव्हर्सिटीचं उद्घाटन करणार आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
उद्या 12 वाजता काँग्रेस भवनमध्ये बैठक
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या पुण्यात
पुण्यात काँग्रेस सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक
उद्या 12 वाजता काँग्रेस भवनला बैठकीचे आयोजन
तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाना पटोले चिंचवडलाही जाणार
बोहरा मुस्लीम समुदायाच्या कार्यक्रमात मोदींचं भाषण :
मी आपल्या परिवाराचा सदस्य आहे. मी इथे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नाही. मला जे सौभाग्य मिळालं आहे ते खूप कमी लोकांना मिळालं आहे. मी या परिवाराच्या चार पिढ्यांशी जोडलो गेलोय.
इतकं मोठं भाग्य मला मिळालं. चारही पिढ्या माझ्या घरी आल्या आहेत. असं सौभाग्य खूप कमी लोकांना मिळतो. त्यामुळे तुमच्या चित्रफितमध्ये वारंवार माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय पंतप्रधान असं म्हटलं गेलंय, मी तर आपल्या परिवाराचा सदस्य आहे आणि प्रत्येक वेळी एका परिवाराचा सदस्य म्हणून समोर यायची जेव्हा वेळ आलीय तेव्हा आलोय. यामुळे माझा आनंद वाढला आहे.
एखादा समाज किंवा संघटनाची ओळख या गोष्टीने होते की वेळेनुसार परिवर्तन आणि विकासाच्या कसोटीवर बोहरा समितीने नेहमी स्वत: सिद्ध केलंय. आज अल जमिया सारख्या शिक्षण संस्थाचा विस्तार याचं एक जिवंत उदाहरण आहे.
मी संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं अभिनंदन करतो. हे दीडशे वर्षापूर्वीचं स्वप्न साकार झालंय. बोहरा समजाचा आणि माझं नातं किती जून आहे हे कदाचित कुणी असेल त्याला माहिती नसेल. मी जगभरात कुठेही गेलो तरी प्रेमाचा वर्षाव माझ्यावर होतो.
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी मरोळमध्ये दाखल
बोहरा मुस्लिम समुदायाच्या संकुलाचं उद्घाटन करणार
पंतप्रधान मोदी यांच्याकडून वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पण कार्यक्रमात मराठीतून भाषण
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा
रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होतेय
महाराष्ट्राच्या पर्यटनाला 2 ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा फायदा
वंदे भारत ट्रेन भारताच्या विकासवेगाचं प्रतिक
विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार
देशात एकूण 10 वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या
वंदे भारत एक्सप्रेसमुळे 17 जिल्ह्यातील 108 जिल्हे जोडले गेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील बुधवार वगळता 6 दिवस धावणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
मोदी जगातील लोकप्रिय नेते : एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘वंदे भारत एक्सप्रेस’चं लोकार्पण
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण
सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर लोकार्पण
पंतप्रधान मोदी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दाखवणार हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात CSMT स्थानकावर दाखल होणार
मोदी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
मोदी यांच्या स्वागतसाठी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स
मोदी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दाखवणार हिरवा झेंडा
तसेच मरोळमधील अल-जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करणार
दुपारी 2.25 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनप्रसंगी फडणवीस मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार
दुपारी 3 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीएसटी येथे 2 वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ आणि मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन
दुपारी 4.45 वाजता : त्यानंतर मोदी यांच्या हस्ते मरोळ येथे सैफी युनिव्हर्सिटीच्या नवीन कँपसचे उद्घाटन
रात्री 8 वाजता : देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये भाजपा राज्य पदाधिकारी बैठकीला हजर राहणार
संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका
केवळ मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा होत असल्याचा राऊत यांचा आरोप
वंदे भारत ट्रेन हिरवा कंदील हे निमित्त आहे, खरं कारण महापालिका निवडणुका आहेत, राऊत यांचा दावा
ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार
यावेळी मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
त्यानंतर अंधेरी मरोळ येथील बोहरा समाजाच्या अरबी अकादमीचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे.