पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसवर घणाघात केला. “राजकीय पक्षाचं हे कर्तव्य असतं की, त्यांनी जनतेच्या समस्यांचं निराकारण करावं. पण काँग्रेस पक्ष स्वत: समस्यांची जननी आहे. स्वातंत्र्यापासून तुम्ही पाहा. देशाचं विभाजन झालं. जातीच्या नावाने हे विभाजन कोणी केलं? देश स्वातंत्र्य होताच काश्मीरमध्ये तणाव निर्माण केला गेला. आमच्या आजूबाजूचे दुनियाचे अनेक देश स्वातंत्र्य झाले. ते खूप पुढे गेले. पण आमचा भारत मागे जात राहिला. त्यावेळी देशात कुणाचं सरकार होतं? देश कित्येक दशकांपर्यंत आतंकवादचा शिकार राहिला. बॉम्बस्फोट व्हायचे. तुष्टीकरण करण्यासाठी दहशतवाद्यांना कोण संरक्षण देत होतं?”, असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले.
“देशात नक्षलवादाची संख्या भयानक झालीय. हा लाल आतंक कुणाची देण आहे? स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही राम मंदिरचा 500 वर्षांपूर्वीचा मुद्दा वादात होता. अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणावर कोण विरोध करतं होतं? कोर्टात कोणत्या पक्षाचे वकील भगवान रामांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करत होते? कोणत्या पक्षाचे वकील सुप्रीम कोर्टात जावून राम मंदिर प्रकरणार निकाल न देण्याची मागणी करत होते? कोणत्या पक्षाचे लोक राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला? कोणत्या पक्षाने कित्येक दशकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही?”, असेदेखील प्रश्न मोदींनी उपस्थित केले.
“प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे. गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे. तुम्ही एनडीएला पूर्ण बहुमत दिलं. आम्ही देशाच्या मोठमोठ्या समस्या सोडवल्या आहेत. आज महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशात नक्षलवाद कमजोर पडलाय. जो गडकरी जिल्हा नक्षलवाद्यांच्या हिंसेसाठी ओळखला जायचा, आता त्याची चर्चा विकास आणि स्टीलच्या कंपनीसाठी होत आहे. आमचं गडचिरोली आता पोलाद सिटी बनत आहे. आमच्या इथे मराठीत एक म्हण आहे. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच. ही म्हण काँग्रेसला लागू होते. ते सुधरूच शकत नाही. ते कधीच बदलणार नाहीत”, अशी टीका मोदींनी केली.
“आपल्या कर्तृत्वामुळे काँग्रेस पक्ष देशातील जनसमर्थन मिळवू शकत नाही. काँग्रेसच्या घोषणापत्रात मुस्लीम लीगची भाषा आहे. त्यांचे खासदार भारताच्या आणखी एक विभाजनाची गोष्ट करत आहेत. इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला विभक्त करण्याची धमकी देत आहेत. इंडिया आघाडीतील डीएमके पक्ष सनातन पक्षाला डेंग्यू, मलेरिया म्हणून त्याच्या खात्माची भाषा करत आहे. काँग्रेस आणि नकली शिवसेनावाले त्याच लोकांना महाराष्ट्रात आणून त्यांची प्रचारसभा घेत आहेत”, अशी शब्दांत मोदींनी निशाणा साधला.
“मोदी शाही कुटुंबात जन्माला येऊन पंतप्रधान बनलेला नाही. मोदी एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन, जनसामान्यांमध्ये राहून इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मला माहिती आहे, ज्या कोट्यवधी नागरिकांकडे घरं नव्हती त्यामध्ये दलित, मागास, आदिवासी यांचं जास्त प्रमाण होतं. दलित, वंचित, आदिवासी यांच्या वस्तीत पाणी नव्हतं. वीज नव्हतं. याच समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या अभावाने झुंजावं लागत होतं. त्यामुळे मोदीने गॅरंटी दिली होती की, आमचं सरकार दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबांचं जीवन बदलण्यासाठी काम करेल. मोदीने वंचितांचं जीवन बदलण्यासाठी निरंतर मेहनत केली आहे. देशात ज्या 4 कोटी गरिबांना पीएम आवास मिळाले आहेत त्यामध्ये याच वर्गाचे लोक जास्त आहे. आम्ही ज्या 10 कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना मोफत उजाला योजनेतून सिलेंडर दिले ते याच वर्गासाठी दिले”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.