रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलांशी संवाद साधला. 30 मे रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा ऑनलाईन संवाद पार पडला. प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन (PM care For Children) योजने अंतर्गत आयोजित या संवाद कार्यक्रमात रायगडमधील बालकांनीही सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांना पंतप्रधान मोदींचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे (Ayushman Bharat Insurance Scheme) कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक अशा विविध लाभाचे वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
PM CARES for Children, आप सभी ऐसे कोरोना प्रभावित बच्चों की मुश्किलें कम करने का एक छोटा सा प्रयास है, जिनके माता और पिता, दोनों नहीं रहे।
PM CARES for children इस बात का भी प्रतिबिंब है कि हर देशवासी पूरी संवेदनशीलता से आपके साथ है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
कोरोना काळात आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड निधीतून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेतून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमान दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियमही पीएम केअर फंडातून भरला जाईल. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह स्नेह प्रमाणपत्रही देण्यात आलं.
PM-CARES for Children Scheme will support those who lost their parents to Covid-19 pandemic. https://t.co/p42sktb6xz
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2022
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनाथ बालकांना मोफत शिक्षण तसंच 15 लाखाच्या पॅकेजचं वितरण करण्यात आलं. केंद्र आणि राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अनाथ मुलांसोबत संवाद साधला. तसंच पंतप्रधान मोदी यांनी मुलांची विचारपूसही केली.
‘पी एम केयर्स फ़ॉर चिल्ड्रन’ सभी ऐसे कोरोना प्रभावित बच्चों की मुश्किलें कम करने का छोटा सा प्रयास है, जिनके माता-पिता कोरोना महामारी में नहीं रहे। #8YearsOfSeva #PMCaresForChildren pic.twitter.com/hI9wwU99cf
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 30, 2022