पुण्यामध्ये पुन्हा सापडलं मोठं घबाड, काल 5 कोटी आजचा आकडा पाहून पोलिसांनाही बसला धक्का

| Updated on: Oct 22, 2024 | 7:22 PM

पुण्यामध्ये सोमवारी पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती, त्यानंतर आज देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पुण्यामध्ये पुन्हा सापडलं मोठं घबाड, काल 5 कोटी आजचा आकडा पाहून पोलिसांनाही बसला धक्का
Follow us on

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठलेही गौरव्यवाहार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असून, नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू होत आहे. सोमवारी नाकाबंदी दरम्यान पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी ही सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

पुण्यातील हडपसर रोडवर नाकाबंदीदरम्यान आज दुपारच्या सुमारास एका गाडीमध्ये तब्बल 22 लाख रुपये आढळून आले आहेत. हडपसर- सोलापूर रोडला गाडीमध्ये ही बावीस लाख रुपयांची रक्कम सापडली आहे. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून या गाडीची चेकिंग सुरू असताना त्यामध्ये ही रक्कम आढळून आली आहे. ही रक्कम किराणामाल दुकानाच्या होलसेल व्यापाऱ्याचे बिल आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता ही बावीस लाखांची रक्कम आढळून आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

खेड-शिवापूर परिसरात आढळली पाच कोटींची रक्कम 

खेड -शिवापूर परिसरात सोमवारी नाकाबंदीदरम्यान पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना एका वाहनात पाच कोटी रुपयांची रक्कम आढळून आली होती. या प्रकरणाचा शोध सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात बावीस लाखांची रक्कम सापडली आहे. ही रक्कम होलसेल व्यापाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.