बीड पोलीस दलातील एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर शरण आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला हरिभाऊ खाडे याच्या चाणाक्यपुरी येथील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला (एसीबी) घबाड मिळून आले. एसीबीला एक कोटी आठ लाख ७६ हजार रुपये रोख, ७२ लाखांचे सोन्याची बिस्किटे आणि सोने, चार लाखांची साडे पाच किलो चांदी मिळून आली आहे. 15 मे रोजी एक कोटीच्या लाचेतून पाच लाख घेताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यानंतर हरिभाऊ खाडेचा सोध घेत होते. अखेर खाडे एसीबी पोलिसांना शरण आले आहे.
जिजाऊ मल्टिस्टेट पथसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटीची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, फौजदार आर. बी. जाधवर हे फरार झाले. त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथके नेमली होती.
लाचखोर फरार पोलीस निरिक्षक हरिभाऊ खाडे एसीबी समोर शरण आला आहे. खाडेला पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथक फिरत होते. आता चौकशीतून खाडेने जमवलेली अपसंपदा समोर येणार आहे.
माजलगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे एसीबीने कारवाई केली. त्याच्या घरात लाखोंचा ऐवज मिळाला आहे. माजलगाव पाटबंधारे विभाग परळी (वर्ग 1) कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर या अधिकाऱ्याला तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याचा परवानगी मिळण्यासाठी 28 हजाराची लाच घेताना बीड ACB ने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.
अंबाजोगाईत आनंद नगर येथील त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली. यावेळी 11 लाख 78 हजार 465/- रुपये रोख, सोन्याचे 30 ग्रॅम दागिने, तीन किलो चांदी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.