कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, या ड्रग्जचा मास्टरमाईंड आहे कोण ?

| Updated on: Mar 03, 2023 | 1:09 PM

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष ॲापरेशन राबवून ही कारवाई केलीय. नागपूरातील सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आलीय.

कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, या ड्रग्जचा मास्टरमाईंड आहे कोण ?
एनसीबीकडून एमडी ड्रग जप्त
Follow us on

नागपूर : नागपूर शहरात अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथकाने ड्रग्ज तस्करीबाबत मोठी कारवाई केली आहे. नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलीय. अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपूरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपये किंमतीचे हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. आता या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे ? त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. बाहेरच्या राज्यातून नागपुरात एमडी ड्रग्ज आले का ? याबाबतही तपास केला जात आहे.

 

हे सुद्धा वाचा

नागपूर शहरात 1 कोटी 91 लाख रुपये किंमतीच्या एक किलो ९११ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथकाने ही कारवाई केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष ॲापरेशन राबवून ही कारवाई केलीय. नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आलीय. अंमली पदार्थ विरोधी पथकाची नागपूरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई. होळीच्या निमित्ताने नागपूरात एमडी ड्रग्ज पाठवण्यात आल्याच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलीय.

कोणाकडून केले ड्रग्ज जप्त

कुणाल गबने आणि गौरव कालेश्वरवार यांच्याकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेय. यामागे कोण मास्टरमाईंड आहेत. यासह ड्रग्ज तस्करीत कोण कोण सहभागी आहे, याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीसांनी विशेष पथक गठीत केलंय. अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

काय असते मेफेड्रोन पार्टीतील ड्रग्ज

हे ड्रग्ज मिथाइलीनन डायऑक्सी, मथैमफेटामाईन आणि मेफेड्रोन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. प्रत्येक देशात याची वेगवेगळी नावे आहेत. हे ड्रग्ज नाकातून किंवा पाण्यातून घेतले जाते. या ड्रग्जच्या एक ग्रॅमची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. नशा करणाऱ्यांत या ड्रग्जची वेगवेगळी नावेही आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूपर्यंत नशा जातो अन् धुंदी येते. परंतु सतत हे घेतल्यानंतर जीवाला धोका होण्याचीही शक्यता असते.

म्याऊ म्याऊ ड्रग्ज म्हणूनही परिचित

मेफेड्रोनला साधारणपणे म्याऊ म्याऊ ड्रग्ज नावाने ओळखले जाते. रेव्ह पार्ट्यांत या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे ड्रग्ज अफगाणिस्तान नायजेरियात जास्त प्रमाणात तयार करण्यात येते. पार्टी ड्रग्ज म्हणून याचा वापर देशातही करण्यात येतो. रेव्ह पार्टीत यापूर्वी एलएसडी, लिसर्जिक एसिड डायइथाइम अमाइडचा वार करण्यात येत होता. मात्र त्यानंतर याबाबत कठोर कायदे आल्यानंतर मेफेड्रोनचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे.