गणेशोत्सव काळात पुण्यात 7 ते 12 तारखेपर्यंत रात्री 10 पर्यन्त लाऊडस्पीकर सुरु ठेवता येणार आहेत. तर 12 ते 17 तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवस शहरात रात्री 12 वाजेपर्यन्त लाऊडस्पीकर सुरु ठेवण्यास परवानगी असेल. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी टीव्ही 9 ला ही माहिती दिली आहे. गणेशोत्सव काळात सात हजार पोलिसांचा शहरात बंदोबस्त असणार आहे. गणेशोत्सव काळात 7, 16 आणि 17 तारखेला तीन दिवस शहरात दारू बंदी असणार आहे. तर फरासखाना, विश्रामबाग आणि खडक भागात 10 दिवस दारू बंदी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोयता मिळणाऱ्या ठिकाणाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे शहरात यंदा 3798 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. घरगुती गणपतीची संख्या 664257 इतकी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. लेझर लाईटला बंदी असणार आहे. 10 क्युआरटी टीम्स तैनात असणार आहेत. सोशल मीडियावर काही आपत्तीजन्य पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात पोलीस तयार आहेत. 3 टप्प्यांत पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी 3 हजार पोलीस बंदोबस्त करणार आहेत. 1200 होमगार्ड देखील मदतीला असणार आहेत. 622 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. तर 324 गुन्हेगारांना हद्दपार केलं आहे. दंगलीच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली आहे. जुने नाशिक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. 16 तारखेच्या दंगलीत चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस सज्ज आहे. गणेशोत्सवात सहा हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त असणार आहे. नागपुरात चौदाशे मंडळात बाप्पांची स्थापना होणार आहे. डीजे वाजवणाऱ्यांवर, कर्णकर्कश आवाज, गोंगाट घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना आहेत. पोलिसांबरोबरच होमगार्ड देखील तैनात असणार आहेत. गणेश मंडळांना सीसीटीव्ही आणि स्वयंसेवक नियुक्त करण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत.
#WATCH | Mumbai: On security arrangements during Ganesh Chaturthi celebrations, Joint CP Law & Order Satyanarayan Chaudhary says, “Mumbai Police has made adequate arrangements for ‘Ganpati Agaman’. Security has been deployed on all routes and the pandals have also been secured.… pic.twitter.com/dNF5DxaSSw
— ANI (@ANI) September 6, 2024
गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्थेबद्दल, जॉइंट सीपी कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, “मुंबई पोलिसांनी ‘गणपती आगमण’साठी पुरेशी व्यवस्था केली आहे. सर्व मार्गांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि मंडप देखील सुरक्षित करण्यात आले आहेत. आम्ही बैठका घेतल्या आहेत. सर्व गणपती विसर्जनासाठी सीसीटीव्ही, ट्रॅफिक मॅनेजमेंट, 30 डीसीपी आणि सुमारे 2500 अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, इतर विशेष तुकड्याही तैनात केल्या आहेत.