मनेश मासोळे, Tv9 मराठी, धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार कारवाई सुरु आहेत. धुळे शहरातील आग्रा रोडवर मुख्य बाजारपेठेमध्ये 55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका कापड व्यापाऱ्याकडून रोकड जप्त करण्यात आलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा विभागाने ही कारवाई केली आहे. नोटांची मोजणी सुरू आहे. सुमारे 55 लाख रुपये रक्कम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी इनकम टॅक्स विभाग तपासणी करणार आहेत. तोवर नोटा ट्रेझरी बँकेमध्ये जप्त असणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक पथकाने जोरदार कारवाई केली आहे. मतदारसंघात 3 कोटींची कारवाई करण्यात आलीय. 6 मार्चपासून 6 मे पर्यंत या कालावधीत 80 ठिकाणी कारवाई केली गेलीय. यात रोकड आणि दारु मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलीय. 14 लाख 50 हजार रुपये रोकड तर 2 कोटी 46 लाख रुपयांची 91 हजार लीटर दारु जप्त करण्यात आलीय. 30 लाख रुपयांचा अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
आचारसंहिता काळात राज्यभर अंमलबजावणी यंत्रणाद्वारे 24 एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या जप्तीची माहिती