अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये चांदूरबाजारचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे (Sunil Kinge) यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन गायले. यावेळी बच्चू कडू यांची देखील उपस्थिती होती. बच्चू कडू यांनी चादूरबाजारचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, किनगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई यांचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यानिमित्त हा तेराव्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात किनगे यांनी भजन गायले.
किनगे यांनी ‘ओवाळीन जीव माझा सावळे विठाई ‘ हा अभंग यावेळी म्हटला आहे. बच्चू कडू यांनी देखील किनगे यांचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओचे सर्वत्र कौतुक होत आहे. किनगे यांनी हा अभंग राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींच्या तेराव्याच्या कार्यक्रमात गायला आहे.
Video | Bachchu Kadu यांच्या मातोश्रींच्या तेराव्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षकांनी गायले भक्तीगीत – tv9#Amravati #MinisterOfStateBachchuKadu #MatoshriIndirabaiKadu #Belora
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/S2TKLX4tL1
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2022
Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी
Akola | शिवसेना आमदार संतोष बांगरला राज्यात फिरू देणार नाही, वंचितचे राजेंद्र पातोडे असं का म्हणाले?