मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील हा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा उद्या सकाळी 11 वाजता लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे गट नेमकं कोणाच्या बाजूने लागणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. महिन्याभरापूर्वी दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाला. आता येत्या 11 मे म्हणजेच उद्या निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित निकाल हा शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लागला तर शिंदे गटाचे तब्बल 16 आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. या 16 आमदारांविषयी आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.
या सत्तानाट्याचे उद्गाते आणि प्रमुख असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे हे आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही पंचवार्षिक निवडणुकांध्ये ते निवडून आले आहेत. गेल्या 2019च्या निवडणुकीत शिंदे तब्बल 89,300 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगांवकर यांचा पराभव केला होता.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभेच्या 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमधून तीनवेळा निवडून आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांचा 24,381 मतांनी पराभव केला होता.
शिवसेनेचे संदीपान भुमरे यांचा देखील यामध्ये समावेश आहे. संदीपान भुमरे हे तब्बल पाच वेळा पैठण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 1994, 1999, 2004, 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये निववडून आले होते. त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा 14,139 मतांनी पराभव केला होता.
मतदारसंघ – छत्रपती संभाजीनगर
आमदारकी – 3 वेळा (2009,2014,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राजू शिंदे (अपक्ष)
किती मतांनी विजयी – 40,445 मतं
मतदारसंघ – भूम, परंडा (धाराशीव)
आमदारकी – २०१९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्याआधी 3 वर्षे विधान परिषदेचे आमदार
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांना पराभूत केलं
किती मतांनी विजयी – 32,902 मतांनी विजयी
राजकीय प्रवास – तानाजी सावंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत.
मतदारसंघ – भायखळा, मुंबई
आमदारकी – पहिली टर्म
2019ला कुणाला पराभूत केलं ? – एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण
किती मतांनी विजयी – 20,023 मतं
मतदारसंघ – पारोळा, एरंडोल (जळगाव)
आमदारकी – दोन वेळा (2009,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे सतीश पाटील
किती मतांनी विजयी – 18,002 मतं
मतदारसंघ – महाड
आमदारकी – 3 वेळा आमदार (2009, 2014,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेस उमेदवार माणिकराव जगताप
किती मतांनी विजयी – 21,575 मतं
मतदारसंघ – चोपडा (जळगाव)
आमदारकी – पहिली टर्म (2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे जगदीश वळवी
किती मतांनी विजयी – 20,529
मतदारसंघ – मागाठाणे, मुंबई
आमदारकी – 2 वेळा (2014,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – मनसेचे नयन कदम
किती मतांनी विजयी – 46,547 मतं
राजकीय प्रवास – राष्ट्रवादीतून शिवसेना
मतदारसंघ – अंबरनाथ, ठाणे
आमदारकी – 3 वेळा (2009,2014,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेसचे रोहित साळवे
किती मतांनी विजयी – 29,294 मतं
मतदारसंघ – खानापूर (सांगली)
आमदारकी – 4 वेळा (1990,1999,2014,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशीव पाटील
किती मतांनी विजयी – 26,921 मतं
राजकीय प्रवास – काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना
मतदारसंघ – कोरेगाव (सातारा)
आमदारकी – पहिली टर्म (2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे
किती मतांनी विजयी – 6,232 मतं
राजकीय प्रवास – भाजप ते शिवसेना
मतदारसंघ – बुलढाणा
आमदारकी – 3 वेळा (2009,2014,2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेसचे अनंत वानखेडे
किती मतांनी विजयी – 62,202
मतदारसंघ – वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)
आमदारकी – पहिली टर्म (2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर
किती मतांनी विजयी – 59,163
मतदारसंघ – नांदेड उत्तर
आमदारकी – पहिली टर्म (2019)
2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेसचे डी.पी.सावंत
किती मतांनी विजयी – 12,353