शेवटच्या दिवशी ठाकरे बंधूंचा एकमेकांवर तीव्र घणाघात, राज म्हणाले ‘गद्दार’, तर उद्धव म्हणाले, ‘गुनसे’

| Updated on: Nov 18, 2024 | 8:50 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आज शेवटचा दिवस होता. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर तीव्र टीका केली. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटले, तर उद्धव ठाकरेंनी मनसेला 'गुजरात नवनिर्माण सेना' म्हटले. दोघांनीही एकमेकांच्या राजकीय भूमिका आणि निर्णयांवर जोरदार प्रहार केले.

शेवटच्या दिवशी ठाकरे बंधूंचा एकमेकांवर तीव्र घणाघात, राज म्हणाले गद्दार, तर उद्धव म्हणाले, गुनसे
राज ठाकरे VS उद्धव ठाकरे
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. पुढच्या 30 ते 35 तासांनी ऐतिहासिक अशा क्षणांना सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. त्याआधी आज प्रचाराच्या रणधुमाळीचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी राज्यभरात प्रचाराचं रणकंदन माजलेलं बघायला मिळालं. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील एकमेकांवर टीका-टीप्पणी केली. त्यांनी आजच्या शेवटच्या प्रचारसभांमध्ये दोन्ही भावंडांनी एकमेकांवर अतिशय टोकाची टीका केली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हटलं. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावाच्या मनसे पक्षाला गुनसे गुजरात नवनिर्माण सेना म्हणत घणाघात केला.

राज ठाकरे काय म्हणाले?

“एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेक लोकं निघून गेली, त्या लोकांना ही लोकं गद्दार म्हणाले. अरे गद्दार तर घरात बसला आहे ज्याने पक्षाशी गद्दारी केली”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. “या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस बाळासाहेबांना त्रास देवून जो फुटून पहिला गेला त्या माणसाला हा माणूस मातोश्रीवर जेवायला बोलवतो. म्हणजे बाळासाहेबांना त्रास दिला ते सोडून द्या. त्याचं यांना काही देणंघेणं नाही, बाकीचे शत्रू आहेत”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्युत्तर

राज ठाकरे यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. “एक पक्ष आहे कोणातातरी, सुरुवातीला त्याचा झेंडा वेगळा होता. आता झेंडा बदललेला आहे. निशाणी सुद्धा इंजिन कधी इकडे तर कधी तिकडे. पहिलं नाव होतं मनसे, आता गुनसे झालंय. म्हणजे गुणांची वाणवा पण गुजरात नवनिर्माण सेना, जो महाराष्ट्राचा घात करेल. जो कुणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुनसे साथ देणार हे त्यांनी ठरवलेलंच आहे. म्हणजे ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काय वाट्टेल ते बोलायचं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.