खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन, लाल दिवा लावणं भोवलं, पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी भरला इतका दंड

| Updated on: Jul 15, 2024 | 9:43 AM

पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.

खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन, लाल दिवा लावणं भोवलं, पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी भरला इतका दंड
IAS officer Pooja Khedkar
Follow us on

Pooja Khedkar Audi Car Fine Paid : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या राज्यासह देशभर चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. त्यातच पूजा खेडकर जी लाल दिवा लावलेली ऑडी कार वापरत होत्या, त्या कारने तब्बल 21 वेळा वाहतूक नियम मोडल्याची माहिती समोर आली होती. वाहतूक नियम मोडल्यामुळे पोलिसांनी त्या कार मालकाला 27 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला होता. अखेर खेडकर कुटुंबियांनी हा संपूर्ण दंड भरला आहे. कार चालकाने निगडी येथे जाऊन हा दंड जमा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकरच्या ड्रायव्हरने पिंपरी चिंचवडमधील निगडी वाहतूक विभागात कारचा संपूर्ण दंड भरला आहे. खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणे, दिवा लावणे यांसह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. खेडकर यांचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर अखेर कुटुंबियांनी हा संपूर्ण दंड भरला आहे.

तब्बल 27 हजार 400 रुपयांचा दंड जमा

त्यांच्या ड्रायव्हरने निगडी वाहतूक विभागात जाऊन हा संपूर्ण दंड भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर या देशभर चर्चेत आहेत. आयएएस पूजा खेडकर यांनी त्यांच्या खाजगी ऑडी कारवर पुढे, मागे महाराष्ट्र शासन असे लिहिले. तसेच वरील बाजूला लाल दिवा लावला होता. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी या कारवर मोटर वाहन कायदा कलम 177 नुसार कारवाई केली होती. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर तब्बल 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

अखेर हा दंड कार चालकाने निगडी येथे जमा केला आहे. निगडी मधील भक्ती शक्ती चौकात वाहतूक पोलीस मुद्दशीर मुशीर ठाणेदार उर्फ अस्लम ठाणेदार वाहतुकीचे नियमन करत असताना कारचालक तिथे आला. त्याने ठाणेदार यांना त्याच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड असल्याचे सांगितले. त्यानंतर कारचालकाने ही दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली.

गाडी कोणाच्या नावावर?

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या गाडीच्या मूळ मालक मनोरमा खेडकर आहेत. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे.