मुंबई : अगदी काही तासात विद्यार्थ्यांनी (Student Protest) शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर जमा होत रान पेटवलं. परीक्षा ऑनलाईन (Online Exam) घ्याव्या या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) याच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. या आंदोलनात हाजारो विद्यार्थ्यांचा उद्रेक दिसून आला. मात्र या उद्रेकाला हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अटकेची शक्यता आहे. या विद्यार्थ्यी आंदोलनाची चौकशी करावी असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. हिंदुस्थानी भाऊवर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावल्याचा आरोप आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्याता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न करूनही आपलं ऐकूण न घेतल्याचा आरोप आधी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आला.
हिंदुस्तानी भाऊला चर्चेसाठी आमंत्रण
या आक्रमक आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊशी चर्चा करून असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडी यांनी दिलं आहे. तर उद्या बैठक घेऊ असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत, मात्र हिंदुस्तानी भाऊला अटक झाली तर ही चर्चा होणार का? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा निश्चितच विचार केला जाईल, काही विद्यार्थी आंदोलन करत असले तरी परीक्षा घ्या म्हणाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या मागणीचाही विचार करावा लागेल असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आंदोलन करून नये असे आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.
विद्यार्थ्यांचं आरोग्य ही प्राथमिकता
विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे, हिंदुस्तानी भाऊशी माझं बोलणं झालं आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांनी शांत होऊन, आंदोलन थाबवणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. काही मुलं परीक्षा रद्द करा बोलत आहेत, तर काही मुलं ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रच्या ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून दिला. परीक्षा जास्तीत जास्त सोयीस्कर कशा होतील याचा विचार नेहमीच केला गेला. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कधीही चर्चेला तयार आहे. त्यांनी यावं चर्चा करावी, त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आवाहन त्यांनी केलं आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले आहे, याचाही विचार करावा लागेल. हे नुकसान वाढू नये, या परीक्षेनंतर सप्लीमेंटरी परीक्षा लवकरात लवकर कशा घेता येतील याचाही विचार सरकारने केल्याची माहिती त्यानी दिली आहे.