मुंबई : आगामी पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात येत्या पाच दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. (possibility of rain with thunderstorm and wind in different district of maharashtra know weather forecast of maharashtra all district in marathi)
कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाने दडी मारली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्यात इतर भागात विजांच्या कडकडाट तर काही ॉठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एकंदरित आगामी पाच दिवस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचा प्रभाव जाणवणार आहे.
पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर आज राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. (Yellow Alert) यामध्ये मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. हिंगोली, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, वाशिम, अकोला, बुलडाणा, नांदेड, वर्धा, अमरावती, नागपूर, जालना, औरंगाबाद, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
४ सप्टेंबर पासून परत राज्यात पावसाचे पुनरागमन
बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाच्या क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४-६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता pic.twitter.com/k0MKLkvFkh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2021
दरम्यान राज्यात मुंबईसह इतर जिल्ह्यांत पावसाची आज पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईतील बांद्रा परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर पश्चिम आणि पूर्व उपनगरातही पावसाच्या सरी कोसळल्या. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस बरसल्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. विजांच्या कडकडाटसह पाऊस पावसाचा जोर अधिक असल्याने कामावर जाणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला दुकानात आडोसा शोधावा लागला. तर परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील हदगाव आणि कासापुरी महसूल मंडळात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले. 25 गावातील तब्बल 18 हजार 700 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
3 Sept, IMD ने आज दिलेल्या इशा-या प्रमाणे,राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटा सहीत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मुसळधार. कोकणात ६,७ Sept ला काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पण.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/ikksIA1dVw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2021
इतर बातम्या :
इम्पिरीकल डाटा कोण देणार? फडणवीस म्हणतात, राज्य मागासवर्ग आयोग, भुजबळ म्हणतात, आम्ही कोर्टात!
मराठवाड्यात नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या
TV9 Impact : नागपुरातील कृषी साहित्य वाटपातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार, कृषी विभागाकडून आदेश
(possibility of rain with thunderstorm and wind in different district of maharashtra know weather forecast of maharashtra all district in marathi)