प्रकाश आंबेडकर यांच्या त्या कबुलीचा व्हिडिओ आमच्याकडे….फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन…पवार गटाचा आरोप

| Updated on: Oct 19, 2024 | 2:14 PM

sharad pawar met dawood ibrahim: प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपला पूरक असे काम करतात. हे वारंवार त्यांच्या कृतीतून त्यांनी सिद्ध केले आहे. दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांच्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे. त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.

प्रकाश आंबेडकर यांच्या त्या कबुलीचा व्हिडिओ आमच्याकडे....फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन...पवार गटाचा आरोप
prakash ambedkar sharad pawar devendra fadnavis
Follow us on

sharad pawar met dawood ibrahim: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु होताच आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणजे भाजपची टीम बी आहे. ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतात. त्यांनी 3 जानेवारीला जो बंद महाराष्ट्रात पुकारला होता तो बंद देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करूनच पुकारला होता. त्यांच्या कबुलीचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंधाचे पुरावे आपल्याकडे आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ऍड. राहुल मखरे यांनी केला आहे. शरद पवार यांनी दुबईत दाऊद इब्राहिम याची भेट घेतली होती, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्या आरोपावरुन विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापले आहे. त्या आरोपास राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

काय म्हणाले राहुल मखरे

प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपला पूरक असे काम करतात. हे वारंवार त्यांच्या कृतीतून त्यांनी सिद्ध केले आहे. दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांच्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे. त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी हे उद्योग सुरु आहे. पवार साहेब आणि दाऊद भेट हे ओढून ताणून आणण्याचे काम प्रकाश आंबेडकर करीत आहेत. ते हा प्रकार केवळ राजकीय फायद्यासाठी करत आहेत, असे राहुल मखरे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर संबंध

देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. गेल्या दहा वर्षात प्रकाश आंबेडकर यांनी एकही वक्तव्य देवेंद्र फडवणीस यांच्या विरोधात केलेले नाही. तसेच आंबेडकरांनी 3 जानेवारीला जो बंद महाराष्ट्रात पुकारला होता, तो बंद देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करूनच पुकारला होता. त्याची कबुली असलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे.

हे सुद्धा वाचा

ही तर भाजपची बी टीम

प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहे. ते देवेंद्र फडवणीस यांना सहकार्य करण्यासाठी काम करीत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. मात्र पवार साहेबांबद्दल त्यांनी अशी वक्तव्य केली तर आम्ही सहन करणार नाही, त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असे राहुल मखरे यांनी म्हटले आहे.