प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेपूर्वी मोठी खेळी, तिसरी आघाडी स्थापन करणार, ‘या’ दोन बड्या नेत्यांना दिली ऑफर

| Updated on: Aug 26, 2024 | 7:45 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर कामाला लागले आहेत. प्रकाश आंबेडकर आगामी विधानसभेपूर्वी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. या तिसऱ्या आघाडीसाठी त्यांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांना ऑफर दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेपूर्वी मोठी खेळी, तिसरी आघाडी स्थापन करणार, या दोन बड्या नेत्यांना दिली ऑफर
प्रकाश आंबेडकर
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांना मोठी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. पण प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत. प्रकाश आंबेडकर राज्यातील जनतेच्या समोर पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत. या तिसऱ्या आघाडीसाठीच प्रकाश आंबेडकर यांनी दोन मोठ्या नेत्यांना खुली ऑफर दिली आहे. यामध्ये पहिलं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं आहे. तर त्यांची दुसरी ऑफर माकप नेते तथा माजी आमदार जे पी गावीत यांना आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरमुळे महाराष्ट्राचं राजकीय समीकरण आगामी काळात बदलणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘छगन भुजबळ यांनी आमच्यासोबत यावं’

“आमच्याकडे सत्ता द्या आम्ही फॉर्म्युला तयार केला आहे ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण देतो. छगन भुजबळ यांनी आमच्यासोबत यावं. त्यांना खुली ऑफर देतो. छगन भुजबळ हेच १००% ओबीसी नेते. त्यांच्या पक्षात ओबीसींवर बोलले जाते का? त्यांनी सांगावं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“राज्यात अराजकता सुरू आहे. त्याला सर्व जबाबदार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर राजकीय पक्ष कोणीही स्पष्ट भूमिका घेत नाही. ह्या परिस्थितीवर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे जबाबदार आहेत”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. “लोकसभेत जरांगे पाटील यांनी ऐनवेळी हात मागे घेतला. जरांगे पाटील यांनी बोलल्याप्रमाणे विधानसभेचे उमेदवार यादी जाहीर करावी. आम्ही विधानसभा निवडणुकीत कोणासोबत जाण्यास तयार नाहीत”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

प्रकाश आंबेडकरांची माकपला ऑफर

“माकपने तिसऱ्या आघाडी सोबत यावे. महाविकास आघाडीसोबत काडीमोड घ्यावी”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी माजी आमदार जे पी गावीत यांना केलं. राज्यातील तिसऱ्या आघाडीसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यावे, अशी खुली ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

“वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करत आहे. आदिवासी आणि ओबीसी एकत्र ठेवत आहे. स्थानिक नेते आरक्षित मतदारसंघात निवडणुकीनंतर आदिवासी प्रश्न दुर्लक्षित करतात. आदिवासींवरील घटनात्मक बंधन आहेत. आदिवासींचे बजेट दिले जात नाही. खर्च ७२% तो इतर ठिकाणी आणि आदिवासी विकास विभागात निधीचा अभाव होतो. पाणी, रस्ता, घर या योजना सर्वांसाठी व्हायला पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणखी काय-काय म्हणाले?

“नाशिकमध्ये सुरू असलेले आदिवासी आंदोलन त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया करून मागील प्रलंबित भरती केली पाहिजे. मुंबईत आमची बैठक होईल, ओबीसी नेते त्या बैठकीला असणार आहेत. आमची मुंबईची बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणार आहे, त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. नागपूर येथे आदिवासींचा एकत्रित कार्यकम होईल, सर्व आदिवासी नेते एकत्र येण्याच्या दृष्टीने उपयोजना सुरू आहे”, असं प्रकाश आंबेडक म्हणाले.

“नागपूर येथे मोठी सभा घेऊ. येत्या 1 संप्टेबरला नव्या आघाडीची घोषणा करू. हिंचासाचारावर सरकार बोलत नाही. जनतेची मानसिकता तुम्ही हिंसाचाराची करत आहेत. आदिवासींचे सर्व समूह एकत्र येत आहेत हे चांगलं झालं. ओबीसी आणि मराठा काही ठिकाणी सुप्त तर काही ठिकाणी वायलेट विरोधात आहेत”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.