Maratha Reservation : ओबीसींचे ताट वेगळे अन् मराठ्यांचे ताट वेगळे… या बड्या नेत्याची रोखठोक भूमिका

| Updated on: Sep 30, 2024 | 3:15 PM

obc maratha reservation: शरद पवारांनी रत्नागिरीच्या सभेत सांगितले होते की, जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला आहे. ओबीसी आणि मराठा समाजात आता दुफळी निर्माण झाली आहे.

Maratha Reservation : ओबीसींचे ताट वेगळे अन् मराठ्यांचे ताट वेगळे... या बड्या नेत्याची रोखठोक भूमिका
Follow us on

मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे. परंतु सर्व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेते अन् संघटनांच्या विरोध आहे. काही राजकीय पक्षांनी यावर उघडपणे भूमिका मांडली नाही. मराठा समाजाची नाराजी नको, म्हणून बडे पक्ष या विषयावर गप्प आहेत. परंतु कधीकाळी मनोज जरांगे यांना पाठिंबा देणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच भूमिका मांडली आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजास आरक्षण देता कामा नये, ही भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे मराठा समाजाचे ताट वेगळे अन् ओबीसीचे ताट वेगळे, असेच प्रकाश आंबेडकर यांनी म्हणायचे आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

पक्षाच्या वतीने ओबीसी संघटना एकत्र करण्याचे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारला मराठा समाजाचा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळ आरक्षण द्यावे, मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नयेमनोज जारांगे पाटील यांची मागणी अद्याप मान्य झाली नाही. मात्र ओबीसी संघटनांनी जी भूमिका घेतली आहे तिला आमचा पाठिंबा आहे. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की ओबीसीचा आरक्षण हे ओबीसीलाच राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी वाद वाढवला

शरद पवारांनी रत्नागिरीच्या सभेत सांगितले होते की, जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला आहे. ओबीसी आणि मराठा समाजात आता दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी समाज मराठ्यांच्या आरक्षण विरोधी तर मराठा समाज आरक्षणाच्या बाजूने झाला आहे.

हे सुद्धा वाचा

मागच्या लोकसभेमध्ये आमच्या भूमिकेमुळे काँग्रेसला फायदा झाला. मग आम्ही काँग्रेसची बी टीम आहोत असं का म्हटलं जात नाही. परंतु आमच्या उभ्या राहण्यामुळे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला नुकसान झाले तेव्हा आम्हाला भाजपची बी टीम आहोत, असा आरोप केला जात होता. लोकसभा निवडणुकीत आम्ही फक्त तीन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवारांना पाठिंबा दिला होता. बारामतीची जागा ही प्रतिष्ठेची असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा मागितला होता. छत्रपती घराण्यातले पहिल्यांदाच उभे राहिले होते त्यामुळे त्यांचा पराभव होऊ नये म्हणून पाठिंबा दिला होता, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

नितेश राणे यांच्या पाठिशी सरकार

नितेश राणे यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसत आहे. यामुळे ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात 32 ठिकाणी हिंदू, मुस्लिम यांच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सुनील केदार यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना पुढच्या वेळी आमच्या सरकार आले की, त्यावेळी तुमचा हिशोब करू असं वक्तव्य केले. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दुर्दैवाने राज्यात काही अधिकारी या सरकारला फेवर करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी न्यूट्रॅल राहायला हवे, तसे ते राहिलेली नाही. त्यामुळे अनेक जणांवर कारवाई झाली आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधातली ही जी भाषा आहे ही आश्चर्यकारक वाटत नाही.