Prakash Ambedkar | 'आगामी निवडणुकांत वंचितची Congress पक्षासोबत आघाडी करण्याची इच्छा'

Prakash Ambedkar | ‘आगामी निवडणुकांत वंचितची Congress पक्षासोबत आघाडी करण्याची इच्छा’

| Updated on: Feb 20, 2022 | 3:56 PM

आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस (Congress) पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा असून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस (Congress) पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा असून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीचा आमचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. आगामी होणाऱ्या निवडणुका या वंचितला काँग्रेस पक्षासोबत लढायच्या आहेत. जाहीररित्या त्यांनी आपलं मत मांडलं. विशेष म्हणजे असं पत्र महिनाभरापूर्वी पाठवलं असूनही काँग्रेसकडून मात्र या प्रस्तावावर अद्याप विचार झालेला नसावा, असं दिसतंय.