मुंबई : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची भेट घेणार आहेत. शाहरुख खानचं मुंबईतील घर मन्नत येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रशांत किशोर यांच्यावर चित्रपट (बायोपिक) बनवण्याबाबत चर्चा होऊ शकते. यापूर्वी प्रशांत किशोरवर चित्रपट बनविण्याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. (Prashant Kishor Will meet Shahrukh Khan at Mannat Mumbai)
निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची चांगली आणि चर्चित कारकीर्द आहे. त्यांच्या विविध धोरणांमुळे बर्याच मोठ्या पक्षांना निवडणुका जिंकण्यात मदत झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस प्रशांत किशोरच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज बनवू शकतं. तथापि, अद्याप ही बाब प्रशांत किशोर यांनी मंजूर केलेली नाही.
दरम्यान, आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात सिल्व्हर ओकवर तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देशातील यूपीएचं नेतृत्व, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर उभं करण्याचं आव्हान आणि यूपीए – 2 बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल माहिती देताना पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले.
इतर बातम्या
शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेकडून स्वागत, पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच – अरविंद सावंत
पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल
‘शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी’, नारायण राणेंचा दावा
(Prashant Kishor Will meet Shahrukh Khan at Mannat Mumbai)