नवी मुंबई : महाविकास आघाडी विरद्ध केंद्र संघर्ष आपण आजपर्यंत पाहिलाय. अशातच आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या (Central govenment) संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (bjp) असं चित्र सध्या राज्यात पहायला मिळतंय. भाजप आमदार प्रशांत ठाकूर (MLA Prashant Thakur) यांना मोठा धक्का बसल्याची माहिती आहे. प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. उलवे नोडमधील पुष्पकनगर मधील सेक्टर 26 मध्ये हा भूखंड आहे. प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना 2019 मध्ये भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आता नगर विकास विभागाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावावरील 300 कोटींचा भूखंड रद्द केला आहे. या कारवाईनंतर राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाल्याचं बोललं जातंय.
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे 2019 मध्ये सिडकोचे अध्यक्ष होते. त्यावेळी भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावे असलेला भूखंड रद्द करण्याचे आदेश आता नगर विकास विभागाने दिले आहेत. प्रशांत ठाकूर यांना संपर्क केला असता ते कॉल उचलत नाहीयेत. आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र सध्या राज्यात पहायला मिळतंय.
मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वाद सुरू असताना शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होता. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं, तर भाजप आणि नवी मुंबईतील नागरिकांकडून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होती. त्यावेळी पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील आंदोलनात सहभागी होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना प्रश्न विचारला होता की, ‘बाळासाहेब ठाकरेंचं नाव विमानतळाला देण्याची एकनाथ शिंदे सोडून कोणीही मागणी केलेली नसतांना ‘सिडको’नं हा प्रस्ताव घाईघाईत का मांडला? असा सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन त्यावेळी राज्य सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष पहायला मिळाला होता. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेनं हा तर वचपा काढला नसावा ना, असा प्रस्न सध्या चर्चेत आहे.
इतर बातम्या
महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा
VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत