मुंबई: एसआरएच्या कार्यालयातील कागदपत्रे चोरून नेणारे प्रवीण कलमे (pravin kalme) पोलिसांना सापडत नाहीयेत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केली होती. त्यामुळ कलमे नक्की गेले कुठे असा सवाल केला जात असतानाच प्रवीण कलमे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे. माझ्याविरोधात एफआयआर झालेला आहे, याची कल्पना मला कशी नाही मिळाली? जितेंद्र आव्हांडांना (jitendra awhad) यावर मी अनेक पत्र लिहिलेली आहेत. त्यावरही अजून कारवाई झालेली नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांना एफआयआर झाल्याचं कळलं कुठून? ते मुंबई पोलीस आहेत का? माझी तक्रार इकॉनोमिक ऑफेन्सकडे गेल्यानंतर माझ्याविरोधात तक्रार होते. हे म्हणजे एक ट्रॅप आहे. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप प्रवीण कलमे यांनी केला आहे. प्रवीण कलमे हे माध्यमांशी बोलत होते.
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आनंद पंडीत, लोसट ग्रूप यांनी 19 इमारतींमध्ये बेकायदेशीर बांधकामं केली. आर्थिक घोटाळे केले. याची आम्ही तक्रार केली होती. सीईओ, एसआरए, म्हाडा आणि संबंधित यंत्रणांना आम्ही कळवलं होतं. निवृत्त आयएएस ऑफिसर मुलाच्या रिसेप्शनमध्ये हे सगळे भेटले आणि त्यानंतर हा सगळा प्लान शिजला असावा, असा दावा प्रवीण कलमे यांनी केला. ते एबीपी न्यूज नेटवर्कशी संवाद साधत होते. आपल्याला अनिल परब, जितेंद्र आव्हाड वाचवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ज्या इमारतीचं इन्स्पेक्शन होतं ती इमारत टायटल क्लिअर नसताना बांधली गेली. एका आरजी ग्राऊंडवर बांधली गेली. त्या इमारतीचं बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी गृह निर्माण मंत्रालयाचा सचिन वाझे आहे असा अत्यंत गंभीर आणि निराधार आरोप माझ्यावर केला होता. त्याचं पत्र सीईओंकडे आलेलं असावं, त्यामुळेच हे पत्र आलेलं असावं किंवा तक्रार केलेली असेल, असा कयास त्यांनी व्यक्त केला.
मी माझं काम संपलं की लगेच भारतात येणार आहे. मला आज कळलं की माझ्याविरोधात एफआयआर झालेला आहे. याबाबत मला अजिबात माहिती नव्हती. याबाबत कोणत्याही यंत्रणेचा ना मला फोन आलाय, ना ई-मेल केलाय. माझे वकील लंडनला आहेत. आम्ही कायदेशीर प्रक्रिया करतोय. मी लंडनमध्ये नाही. मी मिडल ईस्टमध्ये आहे. माझ्यावर एफआयआर झालेला आहे, हे कळलं असतं, तर तुम्ही म्हणू शकता की मी पळालो म्हणून. पण मला माहीतच नाही, की असा काही एफआयआर झालेला आहे ते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी अजून एफआयर वाचलेला नाही. त्यामुळे त्याची माहिती नाही. 25 जून 2022ला मी एक आरटीआय फाईल केले होते. एका बिल्डिंगच्या चौकशीवेळी सोमय्या साहेब आलेले होते. नंतर आम्हाला कळलं की सोमय्यांच्या पत्रामुळे चौकशी रद्द झाली आहे. याबाबत आम्ही कोर्टातही दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टानं आमची याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. मी मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या: