नाशिकः नाशिका महापालिका क्षेत्रातील जमीन मिळकतीचे नकाशे तयार करण्यात आले असून, मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिका विस्तारित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या मौजे नाशिक क्षेत्रातील मिळकतीचे नगर भूमापन नकाशे तयार करण्यात आले आहेत. मालकी हक्क निश्चित करणेसाठी मिळकतीचे हक्क चौकशीचे काम सुरू आहे, अशी माहिती विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श. मा.) क्रमांक 1 नाशिक किशोरचंद्र देवरे यांनी दिली आहे. नोव्हेंबर 2021 पासून मौजे नाशिक येथील सर्वे नंबर 867 व 874 मधील सर्व मिळकतीचे हक्क चौकशीचे काम करण्यात येणार आहे. त्या अुनषंगाने नोटीस ‘अ’ प्राप्त झालेले वरील नमुद सर्वे नंबरमधील मिळकत धारक, शेतजमीन मिळकत धारक, भुखंड धारक यांनी त्यांचे हक्क सिध्द करणारे पुरावे, तात्काळ विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श. मा.) क्रमांक 1 नाशिक कार्यालयात सादर करावेत. याबरोबरच आपल्या मिळकतीचा नकाशा व हक्काची नोंद अचूक झाल्याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी किशोरचंद्र देवरे यांनी केले आहे.
पाणंद रस्ते योजना राबवणार
ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायी जाणे देखील मुश्किल होत आहे. शिवाय काळाच्या ओघात शेती व्यवसयात प्रगती होत असतना केवळ रस्ते नसल्यामुळे बागायत क्षेत्र ही वाढत नाही. कारण वाहने येण्याचीच सोय नसते. त्यामुळे ऊसाचे फळबागाचे उत्पादन घेण्याचाही शेतकरी विचार करीत नाहीत. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता आता राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. याकरिता ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला.
नाशिक महानगरपालिका विस्तारित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या मिळकतीचे नगर भूमापन नकाशे तयार केले आहेत. मालकी हक्क निश्चित करणेसाठी मिळकतीचे हक्क चौकशीचे काम सुरू आहे. त्या अुनषंगाने नोटीस ‘अ’ प्राप्त झालेले वरील नमुद सर्वे नंबरमधील मिळकत धारक, शेतजमीन मिळकत धारक, भुखंड धारक यांनी त्यांचे हक्क सिध्द करणारे पुरावे, तात्काळ विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श. मा.) क्रमांक 1 नाशिक कार्यालयात सादर करावेत.
– किशोरचंद्र देवरे, चौकशी अधिकारी
इतर बातम्याः
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरावीत का, जाणून घ्या फायदे आणि तोटे https://t.co/CRewBplmti #CreditCard #InterestRate
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021