Narendra Modi | घरे पाहिली, हेवा वाटला, लहाणपणी आम्हाला… नरेंद्र मोदी भावूक कारण…

| Updated on: Jan 19, 2024 | 12:35 PM

Narendra Modi in Solapur | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या घरांच्या सोसायटीचे सोलापुरात लोकार्पण केले. यावेळी भाषणात पंतप्रधान भावूक झाले. देशातील चार कोटी लोकांना आम्ही पक्के घरे देऊ शकलो, याचे आम्हाला समाधान असल्याचे मोदी यांनी म्हटले.

Narendra Modi | घरे पाहिली, हेवा वाटला, लहाणपणी आम्हाला... नरेंद्र मोदी भावूक कारण...
Follow us on

सागर सुरवसे, सोलापूर, दि.19 जानेवारी 2024 | राजकारण आरोप-प्रत्योरोप होत असतो. परंतु आमचा मार्ग विकास आहे. यामुळे देशातील चार कोटी लोकांना आम्ही पक्के घरे देऊ शकलो. या लोकांना किती आनंद झाला हे त्यांनाच विचारा. देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हाटव नारे लावले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. परंतु आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाही. झोपडीऐवजी आता पक्के घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात सांगितले.

२२ तारखेला रामज्योत लावा

पंढरपूरचे विठ्ठल आणि सिद्धश्वर महाराज यांनी नरेंद्र मोदी यांनी मराठीतून नमस्कार करत भाषणास सुरुवात केली. २२ जानेवारी रोजी भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. संताच्या मार्गदर्शनाखाली मी यम नियमांचे कठोर पालन करत आहे. तुमच्या आशीर्वादाने अकरा दिवसांचे हे व्रत मी करणार आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर आपले राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २२ तारखेला संध्याकाळी सर्वांनी घराघरात रामज्योती लावावी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण आज सोलापुरात झाले. मी ही घरे पाहिली, त्यानंतर मला या घरांचा हेवा वाटला. लहाणपणी आम्हाला असे घर मिळाले असते तर…हे सांगताना नरेंद्र मोदी यांचा कंठ दाटून आला. महाराष्ट्रातील एक लाख लोकांना हक्काचे घर मिळत आहे. आम्ही चार कोटी पेक्षा जास्त पक्के घरे बनवले आहे.

हे सुद्धा वाचा

२५ कोटी लोक गरीबीतून वर आले

देशातील २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले. आम्ही फक्त देशातील गरीबाना साधन दिले. सुविधा दिल्या. त्यांनी स्वत: गरीबीतून वर येण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमामुळे होत आहे. स्वनिधी योजनेतून गरीबाना कर्ज मिळत आहे. माझ्या गॅरंटीमुळे गरीबांना कर्ज मिळत आहे.

हे ही वाचा

आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट, मोदींच्या हस्ते आज लोकार्पण