VIDEO : नांदेडमध्ये लॉकडाऊन असताना शिख समुदायाकडून जंगी मिरवणूक, तुफान गर्दी, चार पोलीस जखमी

| Updated on: Mar 30, 2021 | 10:51 AM

राज्यात कोरोना रुग्णांचा सातत्याने वाढता आकडा बघता सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत असताना नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Procession of Sikh community during lockdown in Nanded).

VIDEO : नांदेडमध्ये लॉकडाऊन असताना शिख समुदायाकडून जंगी मिरवणूक, तुफान गर्दी, चार पोलीस जखमी
नांदेडमध्ये लॉकडाऊन असताना शिख समुदायाकडून जंगी मिरवणूक
Follow us on

नांदेड : राज्यात कोरोना रुग्णांचा सातत्याने वाढता आकडा बघता सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत असताना नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये शीख समूदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघण करण्यात आलं. विशेष म्हणजे नांदेडमध्ये सध्या लॉकडाऊन आहे. मात्र, तरीही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. याशिवाय पोलिसांनी या मिरवणुकीला परवानगी दिली नव्हती. मात्र, तरीदेखील मिरवणूक काढण्यात आली.

चार पोलीस कर्मचारी जखमी

“आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांचा नियोजित कार्यक्रम सुरु असताना निशान साहेब गेट नंबर 1 पर्यंत आलं. पण बाहेर काढण्यावरुन त्यांच्यात आपसात वाद झाला. ३०० ते ४०० मुलांनी हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले. त्यांनी पारंपरिक मार्गाने हल्लाबोल केला. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांवर दडपण, खासदारांचा दावा

“नांदेडमध्ये घडलेली ही घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीत काम करत आहे. पण पोलीस प्रशासन कोणच्यातरी दडपणाखाली काम करतंय. पोलीस अधिक्षकांना स्वत: निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय ते निर्णय घेऊ शकत नाहीत. नांदेडमध्ये मटक्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. नांदेडमध्ये गुरुद्वारमध्ये जे घडलं ते त्याचाच परिणाम आहे”, अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी दिली.

व्हिडीओ बघा :