OBC Reservation : सरकारच्या शब्दावर विश्वास दाखवून अखेर लक्ष्मण हाकेंनी सोडलं आमरण उपोषण

| Updated on: Jun 22, 2024 | 3:49 PM

OBC Reservation : राज्यातील महायुती सरकारला लक्ष्मण हाकेंची समजूत घालण्यात अखेर यश आलं आहे. 10 दिवसानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे घेतलं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये सरकारच शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी आलं होतं.

OBC Reservation : सरकारच्या शब्दावर विश्वास दाखवून अखेर लक्ष्मण हाकेंनी सोडलं आमरण उपोषण
laxman hake
Follow us on

OBC आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी मागच्या दहा दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. जालन्यात वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु होतं. आज सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलं. आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारच्या शिष्टमंडळाने पटवून दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळात पाच मंत्र्यांसह १२ जणांचा समावेश आहे. आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाल्यानंतर एअर पोर्ट्वरच शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यात वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले. ‘आम्ही आंदोलन थांबवलेलं नाही. आंदोलन स्थगित करत आहोत’ असं लक्ष्मण हाके म्हणाले.

“आपलं आंदोलन दहा दिवसांपासून सुरू आहे. मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एकदोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावर सरकाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचं शिष्टमंडळाला विनंती आहे. गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजमधील आरक्षण पेंडिग आहे. आमची 56 हजार गावे वंचित आहे. एक हजार पंचायत सदस्य भेटून गेले आहेत. शासनाने कोर्टात काही विनंती केली पाहिजे. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्याला डावललं जात आहे हे समजू नये. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आताचं आंदोलन स्थगित करत आहोत” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

OBC आरक्षणाला धक्का लागेल ही भीती

मराठ्यांना कुणबी ठरवून OBC मधून आरक्षण द्याव ही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सग्या-सोयऱ्यांनाही आरक्षण द्याव ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण यामुळे OBC आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. त्यासाठीच लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस होता. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.

सरकारचं शिष्टमंडळात कोण-कोण?

सरकारच्या शिष्ट मंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री आहेत. गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा आहेत. जालना वडीगोद्रीत ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली आहे. उपोषणस्थळी ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली होती.