‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा’…कांद्यासाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार…शक्तीप्रदर्शनाची तयारी

| Updated on: Dec 11, 2023 | 9:56 AM

nashik onion and ncp sharad pawar| राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार सक्रीय आहे. राज्यभर ते दौरे करत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहे. आता कांद्या प्रश्नावर आंदोलनासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरत आहे. यामुळे नाशिकमध्ये बॅनर झळकले आहे. 'महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा'...

महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा...कांद्यासाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार...शक्तीप्रदर्शनाची तयारी
sharad pawar banner
Follow us on

चंदन पुजाधिकारी, नाशिक | 11 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार चांगलेच सक्रीय झाले आहे. अजित पवार यांनी आपली वेगळी वाट निवडली. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार गेले. त्यानंतर शरद पवार यांनी हार पत्करली नाही. राज्यभरात ते दौरे करत आहे. आता कांदा प्रश्नावर आंदोलनासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरत आहे. यामुळे नाशिकमध्ये बॅनर झळकले आहे. ‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा’ या आशयाच्या बॅनरमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संदेश दिला आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. यामुळे शरद पवार यांनी स्वत: रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. शरद पवार गटाकडून नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. चांदवड येथे महामार्गावर सकाळी ११ वाजता होणार ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरु होणार आहे. आंदोलनानंतर शरद पवार संबोधित करणार आहेत.

कांदा व्यापाऱ्यांनी बंद घेतला मागे

कांदा निर्यातबंदीविरोधात नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. आता लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांदा लिलाव सुरु होणार आहे. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा बंद मागे घेण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसानंतर अखेर कांदा लिलाव सुरु होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत. लासलगावसह अन्य बाजार समितीमध्ये दुपारी एक वाजेनंतर कांद्याचे लिलाव होणार आहे. कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांजवळ केली होती. यामुळे सोमवारी काय बाजार भाव निघतात याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा

रविकांत तुपेकर आक्रमक

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला जावे लागेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. शहरी भागातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. परंतु यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वाजपेयी यांचे सरकार सुद्धा कांदा निर्यात प्रश्नावर पडले होते, याची आठवण रविकांत तुपकर यांनी करुन दिली.