Pune Bus Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. घटना घडल्याच्या 72 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठेकल्या आहेत. 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेला जीवेमारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर, पुणे येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
सांगायचं झालं तर, दत्तात्रय रामदास गाडे याने केलेला बलात्काराचा पहिला गुन्हा नाही. याआधी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना दत्तात्रय रामदास गाडे याचे आई – वडील आणि गर्लफ्रेंडची देखील चौकशी केली आहे. चौकशीत आरोपचीच्या गर्लफ्रेंडने धक्कादायक खुलासा केला आहे.
आरोपीची गर्लफ्रेंड म्हणाली, ‘दत्तात्रय रामदास गाडे सतत माझ्या मैत्रीणींचे मोबाईल नंबर मागायचा. त्याला सतत माझ्या मैत्रीणींबद्दल जाणून घ्यायचं असायचं… त्याने अनेक तरुणींना त्रास दिला आहे…’ असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या गर्लफ्रेंडने केला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आता बलात्कार प्रकरणी आरोपील अटक झाली असून शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
पुणे अत्याचार प्रकरणात 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षिस देखील घोषित करण्यात आलं होतं. अखेर आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या.