पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पुण्यात आज 399 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे माहापालिका (Pune Municipal Corporation) अलर्ट झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सोमवारी, 3 जानेवारी रोजी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत पुणे शहरात कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करावी का? तसंच शाळा पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात का? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारीही करण्यात आली आहे. पुणे शहरात 40 ठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी जवळपास अडीच लाख पात्र विद्यार्थ्यांचं लसीकरण होणार असल्याची माहिती मिळतेय.
IMP : १५ ते १८ वयोगटासाठीची कोरोना लसीकरण केंद्र ४० पर्यंत वाढवली.
पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १५ ते १८ वयोगटासाठी सुरु होणाऱ्या
(१/२) pic.twitter.com/enQq8tAujS
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 31, 2021
पुण्यात आज दिवसभरात 399 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज पुणे शहरात एक तर शहराबाहेर एक अशा दोन कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. पुण्यात 2 हजार 70 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 92 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.
दिवसभरात नवे ३९९ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ३९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ५ लाख १० हजार ६१७ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 1, 2022
दिवसभरात ७ हजार ५८८ टेस्ट !
पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ५८८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३८ लाख ७२ हजार ७०१ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 1, 2022
दिवसभरात १२७ रुग्णांना डिस्चार्ज !
शहरातील १२७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ९९ हजार ४३० झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 1, 2022
इतर बातम्या :