विनय जगताप, वेल्हा, पुणे : पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या (Pune District Katraj Milk Producers Association) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून (Election) वेल्हातील दोघा उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर (Bhagwan Pasalkar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पासलकर हे वेल्हे तालुका मतदारसंघातून बिनविरोध झाले आहेत. या मतदार संघात एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी दोघांनी माघार घेतल्याने मतदारसंघातून विद्यमान संचालक भगवान पासलकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. 8 मार्चपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असून त्यानंतर केवळ भगवान पासलकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वेल्हा तालुक्यातील दोघांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. या मतदार संघात तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यापैकी दोघांनी माघार घेतल्याने या मतदार संघातून विद्यमान संचालक भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. 8 मार्चपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील अकरा दिवसांनी पासलकर यांच्या निवडीची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या सोळापैकी तीन जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या आहेत. वेल्हे तालुका मतदार संघातील तीनपैकी माणिक पासलकर आणि शोभा पासलकर या दोन उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्यानं विद्यमान संचालक भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे.
याआधी हवेली तालुका मतदारसंघातून म्हस्के यांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत तीन जणांनी कात्रज डेअरीच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. यामुळं आता 16 जागांसाठी 88 उमेदवार रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्जाची 22 फेब्रुवारीला छाननी झाली, तेव्हापासून येत्या 8 मार्चपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे.
संबंधित बातम्या :
जुन्नरमध्ये सोसायटीच्या निवडणुका रंगवतायत ‘भाऊबंदकी’ तील राजकारणाचा पारा
मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदा मुंबईबाहेर, ठिकाणही ठरलं, राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर