पुणेरी मिसळ अन् पुण्यातील अमृततुल्य (चहा) चांगले प्रसिद्ध आहे. यासाठी विविध कट्टे ठरले आहेत. मिसळची चव कुठे घ्यावी अन् चहा कुठे घ्यावा, हे पुणेकरांना माहीत आहे. यामुळे या ठिकाणी सकाळ असो की दुपार खवय्यांची गर्दी असते. आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. पुणे लोकसभेतील तिन्ही उमेदवार जाहीर झाल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून मुरलधीर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. त्यात मनसे सोडून वंचित आघाडीत सामील झालेले वसंत मोरे यांनी रंगत आणली आहे. प्रचार करताना उमेदवारांच्या गाठीभेटी होत राहतात. मग नमस्कार, चमत्कार होतो. आता मुरलीधर महोळ यांच्या प्रभागात रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे एकत्र आले. त्यांनी मिसळपाववर ताव मारला. परंतु त्यावेळी मुरलीधर मोहळ दुसरीकडे प्रचारात होते.
पुणे शहरात निवडणूक प्रचारात उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. परंतु एकमेकांवर भेटल्यानंतर मैत्रीचे दर्शन होत आहे. पुण्यातील राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरे यांच्याकडून पोस्ट करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये वंचित आघाडीकडून मैदानात उतरलेले वसंत मोरे अन् काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मिसळ खाताना दिसत आहेत.
सुसंस्कृत पुणे !
आज रविभाऊ आणि मी, मुरलीआण्णा मोहळ यांच्या प्रभागात कोथरूड येथे सकाळी नाष्टा केला… pic.twitter.com/gJkZcytPNb— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 14, 2024
दोन्ही आपआपल्या कार्यकर्त्यांसोबत शेजारी, शेजारी बसून मिसळचा स्वाद घेत आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जाऊन त्यांनी मिसळपावचा स्वाद घेतला. त्यावेळी मोहोळ यांची कमतरता जाणवली.
पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मनसेमध्ये असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी दिली. भाजपकडून माजी महापौर असणारे मुरलीधर मोहोळ मैदानात उतरले आहे. आता या तिरंगी लढतीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.