भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप, एकाला पकडले

| Updated on: May 13, 2024 | 5:27 PM

भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा केला आहे. पाटील इस्टेट परिसरात भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत होते, असा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जावेद शेख आणि रमेश सय्यद या दोन कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या इसमाला पकडून दिल्याचा दावा केला आहे.

भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप, एकाला पकडले
crime
Follow us on

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले होते. या दरम्यान अनेक ठिकाणी वाद झाले. मतदार याद्यांमधील घोळ, बोगस मतदानाचा प्रकार समोर आला. परंतु पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने हा आरोप केला आहे. या प्रकरणात एकाला पकडण्यात आले आहे.

पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात आज मतदान सुरु आहे. राज्यात एकूण ११ ठिकाणी मतदान सुरु आहे. दोन गटातील प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी होत्या. त्या तातडीने दूर करण्यात आला. आता भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे.

हे सुद्धा वाचा

दोघांना एकाला पकडले

भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा केला आहे. पाटील इस्टेट परिसरात भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत होते, असा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जावेद शेख आणि रमेश सय्यद या दोन कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या इसमाला पकडून दिल्याचा दावा केला आहे. दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

दरम्यान या संदर्भात शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पैशांच्या जोरावर लोकशाहीला अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असताना आपल्या देशाची निवडणूक यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून बसली आहे. डमी उमेदवारांवर मतांसाठी पैसे वाटण्याची वेळ आली म्हणजे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागलाय हे स्पष्ट आहे !

मतदानाचे आवाहन जादूच्या प्रयोगाने

पुण्यात नागरिकांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील रस्त्यावर एका जादूगाराकडून अनोख्या पद्धतीने आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रमध्ये पहिल्या तीन टप्प्यात घटलेली मतदानाची टक्केवारी पाहून चौथ्या टप्प्यात पुण्यातील मतदान वाढावे यासाठी जादूगाराने प्रयत्न केले. मतदानाचे महत्व पटवून देणारी प्रबोधत्मक जादू दाखवत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जितेंद्र रघुवीर या जादूगाराच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.