पुणे : काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाला अवघे तीन दिवस उलटलेले असताना भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा वाढदिवस होता. त्यापार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यकर्त्याने लावलेला बॅनर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतांना त्यामध्ये भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यावरून जगदीश मुळीक यांच्यावर टोकाची टीका होऊ लागली होती. त्यावर स्वतः जगदीश मुळीक यांनी गिरीश बापट यांच्या निधनानंतर माझे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. कुठेही बॅनर लावू नका म्हणून सांगितले होते. मात्र, जो बॅनर लावला तो चुकीचा होता तो काढायला लावला असे सांगून त्यावर प्रतिक्रिया दिली होती.
भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतरही संपूर्ण राज्यामध्ये जगदीश मुळीक यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी जगदीश मुळे यांना काही सवाल उपस्थित करत सडकून टीका केली होती.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली होती. त्यामध्ये अरे सुतक तर फिटू द्या लगेच खासदार होण्याची घाई झाली का? अशा शब्दात सवाल उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला होता.
त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही जगदीश मुळे यांच्या बॅनर वरून सडकून टीका केली होती. जगदीश मुळीक बापट जाण्याची वाट पाहत होते का? अशीही टीका सोशल मिडियावर करण्यात आली होती. त्यावर जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रियाही दिली होती.
मात्र, अद्यापही यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतांना जगदीश मुळीक यांनी यावर आज पुन्हा एकदा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांना डिवचलं आहे. यामध्ये थेट अजित पवार यांच्या बॅनरवरून चिमटा काढला आहे.
जगदीश मुळीक यांनी अजित पवार यांचा एका बॅनरचा संदर्भ दिला. त्यामध्ये मुळीक म्हणाले अजित दादांचा टीशर्टवरील फोटो लावला होता. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते. चेहरा एकाचा आणि धड दुसऱ्याचे. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले होते. ती चूक चालते आमची चूक चालत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.
ज्याने बॅनर लावला तो आमचा कार्यकर्ता नाही. ती चूकच आहे. पण त्यावर आमच्यावर केली जाणारी टीका बरोबर नाही म्हणत जगदिश मुळीक यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना चिमटा काढला आहे.