Pune rape case: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. बस स्टँडवर एका तरुणीचा बलात्कार झाल्यानंतर पोलीस याप्रकरणी अधिक चैकशी करत असून, बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.
पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली आहे, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचे काम सोपे झाले.
बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेला विनंती केली. मला जीवे मारू नको अशी विनंती पीडित तरुणीने आरोपीला केली. दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिल्यामुळे तरुणीने स्वतःच्या जीवासाठी आरोपीकडे विनंती केली. तरुणीचं गावी जायचं तिकीट ही पोलिसांकडे पुरावा जमा करण्यात आला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आलं आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये तिच्यावर गाडेनं बलात्कार केला होता. पसार झालेल्या गाडेला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ताब्यात घेतलं.
गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गाडेसह शिवशाही बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
गाडे वापरत असलेला मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आलं आहे. गाडेने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तरुणीने त्याच्याकडे गयावया केली. त्यानंतर गाडेने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता. पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्याक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविली असून, गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.