पुणे शहरातून विमान प्रवास करणाऱ्यांना आनंदाची बातमी, नवीन अनेक शहरांमध्ये सुरु होणार सेवा

| Updated on: Jun 26, 2023 | 3:11 PM

Pune News : पुणे विमानतळावरुन अनेक प्रकारच्या सुविधा सुरु होत आहेत. या विमानतळावरुन विमानांच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. या ठिकाणी विमानांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. आता नवीन अनेक शहरात पुण्यावरुन थेट जाता येणार आहे.

पुणे शहरातून विमान प्रवास करणाऱ्यांना आनंदाची बातमी, नवीन अनेक शहरांमध्ये सुरु होणार सेवा
flight-travel-plane
Image Credit source: socialmedia
Follow us on

पुणे : पुणे विमानतळावर अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पुणे विमानतळावरुन २४ तास विमान वाहतूक शक्य झाले आहे. पर्यायाने विमानांच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. आता पुणे शहरातून अनेक नवीन शहरात विमानसेवा सुरु झाली आहे. सध्या 11 नवीन विमान सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच रिक्त असलेल्या स्लॉटमध्येही लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे.

सध्या कुठे वाढवल्या विमान फेऱ्या

नवी दिल्ली, नागपूर, जोधपूर, अहमदाबात, बेंगळूर या शहरांमध्ये पुणे येथून विमानांची संख्या वाढवण्यात आली आहे. जून महिन्यापासून या शहरात विमानसेवा सुरु झाल्या आहेत. गो फस्ट या कंपनीने नवी दिल्ली, बेंगळूर, नागपूरसाठी सात विमानफेऱ्या सुरु केल्या आहेत.

आता नवीन कुठे सुरु होणार

राजकोट, वडोदरा या शहरांतही जुलैपासून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे राजकोट अन् वडोदार येथे जाण्यासाठी थेट विमान पुण्यावरुन मिळणार आहे. तसेच गोवा येथेही विमानसेवा सुरु करण्याचा हालचाली सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

सध्या पुण्यावरुन किती फेऱ्या

पुणे शहरातून देशातील विविध शहरांमध्ये विमानसेवा सुरु असते. त्याची संख्या 89 ते 92 आहे. म्हणजे दररोज 178 ते 184 विमानाचे आगमन अन् प्रस्थान होते. मागील वर्षी फेस्टीवल सिजनमध्ये ही संख्या २०० गेली होती.

पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत वाढत असल्यामुळे सुविधांची संख्याही वाढवली जात आहे. यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. यामुळे 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळावर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधले गेले आहे. यामुळे आता पुणे शहरातून दरवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहे.

पुणे शहर शैक्षणिक अन् औद्योगिक शहर आहे. या शहरात देशभरातूनच नव्हे तर विदेशातून लोक येत असतात. शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचवेळी रोजगारासाठी पुणे शहरत अनेक जण आले आहेत. पुणे आयटी सिटी झाल्यामुळे संगणक क्षेत्रात काम करणारे देशभरातून पुण्यात येतात. या सर्वांना याचा फायदा होणार आहे.