पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : पावसाळ्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डे निर्माण होत असतात. पुणे शहर त्याला अपवाद नाही. पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले होते. पुणे शहरातील रस्त्यांचा हा विषय उच्च न्यायालयात गाजला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रस्त्यांवरुन राज्य सरकार आणि महानगरपालिकेला फटकारले होते. आपण आपली जबाबदारी पार पडत नसल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजण्याचे आदेश मनपाला दिले होते. या प्रकारास काहीच महिने झाले असताना पुणे मनपाने रस्त्यांसंदर्भात निर्णय घेतला आहे.
पुणे शहरातील रस्ते चकाचक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील अनेक रस्त्यांचा नव्याने विकास होणार आहे. पुणे शहरातील मुख्य रस्ते आता लवकरच चकाचक होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेकडून रस्त्यांसाठी निविदा काढण्यात आली आहे. तब्बल 170 कोटी रुपयांची ही निविदा आहे. तसेच पुण्यातील हडपसर मुंढवा कोंढवा भागातील रस्त्यांसाठी पुणे महापालिकेकडून नव्याने निधी दिला जाणार आहे.
केवळ पुणे शहरातील रस्ते चकाचक होणार असे नाही. आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांमधील रस्ते सुधारणार आहे. या गावांमधील रस्त्यांसाठी सुद्धा निधी दिला जाणार आहे. महापालिकेने पुण्याच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी नवीन विकास आराखडा तयार केला आहे. तसेच पुणे शहरातील अनेक भागातील रस्त्यांचे देखील नव्याने विकास आराखडे तयार केले आहेत. यामुळे आता पुणे शहरातील रस्ते चकाचक होणार आहे.
मुंढवा-खराडी नदीवरील पूल, गंगाधाम चौकातील उड्डाणपूल, तसेच मुंढवा, बाणेर, बालेवाडी आणि महंमदवाडी येथील रस्त्यांची कामे मनपाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच महंमदवाडी येथील रस्ता, रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील रस्ताही विकसित केला जाणार असल्याचे निविदेतून स्पष्ट होत आहे. पुणे शहरातील रस्ते सुधारणार असल्यामुळे पुणेकरांना आता चांगल्या रस्त्यांवरुन वाहने नेता येणार आहे. परंतु त्यासाठी किती कालावधी लागणार हे, स्पष्ट झाले नाही.