गृहमंत्र्याच्या मतदारसंघातच बैलगाडा शर्यत, २०० जणांवर गुन्हा दाखल; कोरोना नियमांचेही उल्लंघन

| Updated on: Nov 06, 2021 | 1:49 PM

दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर आंबेगाव तालुक्यातील 'गिरवली' व 'वडगाव काशिंबे' या गावात बैलगाडा शर्यत भरवली होती. बैलगाडा घाटात भंडाऱ्यांची उधळण करत स्थानिकांनी शर्यतीला सुरूवात करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीला आजूबाजूच्या परिसरातील बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती.

गृहमंत्र्याच्या मतदारसंघातच बैलगाडा शर्यत, २०० जणांवर गुन्हा दाखल; कोरोना नियमांचेही उल्लंघन
Bullock cart race in Pune
Follow us on

पुणे- राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी असतानाच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात नुकतीच बैलगाडा शर्यत( bullock cart race) भरवण्यात आली होती. मात्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या शर्यतीतील आयोजक व सहभागी अश्या 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घोडेगाव येथील पोलीस स्थानकात पाच जणांसह अज्ञात 100 जणांवर व मंचर पोलीस स्थानकात 100 जणांवर गुन्हा भा. द. वि. क.(IPC)188, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ), म.पो.का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर आंबेगाव तालुक्यातील ‘गिरवली’ व ‘वडगाव काशिंबे’ या गावात बैलगाडा शर्यत भरवली होती. बैलगाडा घाटात भंडाऱ्यांची उधळण करत स्थानिकांनी शर्यतीला सुरूवात करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीला आजूबाजूच्या परिसरातील बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईचीही मोठी गर्दी केली होती. बैलगाडा शर्यतीला बंदी असताना खुद्द गृहमंत्र्याच्या मतदार संघातच भरलेल्या शर्यतींकडं पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष असलेलं दिसून आहे.

कोरोनाचे नियम धाब्यावर
या बैलगाडा शर्यती दरम्यान आयोजक व बघ्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली होती. शर्यती दरम्यान कोणत्याही प्रकारच्या सोशल डिस्टंन्सचं पालन करण्यात आलं नव्हतं, जमलेल्या गर्दीतील कुणीही मास्कही घातला नव्हता.

यापूर्वी सांगलीतही झाली होती बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतींवर असलेली बंदी मोडून काढत ऑगस्ट महिन्यात सांगलीत बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमी कावा करत बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. शर्यत रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी केली होती. परंतु पोलिसांना चकवा देत पडळकरांनी शर्यत भरवून दाखवली होती. ठरलेल्या ठिकाणी शर्यत न भरवता ऐनवेळी दुसऱ्याच ठिकाणी ही शर्यत सुरू करून यशस्वी करण्यात आली होती. ज्या ठिकाणी खरोखर शर्यत होणार होती, त्याबाबत मोजक्याच बैलगाडा मालकांना त्याची माहिती देण्यात आली होती. काही समर्थकांसह रानातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले आणि तीन वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आली.

इतर बातम्या: 

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर

Ahmednagar Hosp राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर शासकीय रुग्णालयात अग्नितांडव, ICU ला आग 6 जणांचा मृत्यू, सूत्रांची माहिती