पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो दोन मार्गांवर सुरु झाली आहे. पुणे मेट्रोचा विस्तार वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बस सेवा अधिक चांगली करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) बदल केले जात आहे. पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस येत आहे. गुगलवर पीएमपीची बस सध्या कुठे आहे? हे कळणार आहे. त्याचबरोबर पीएमपी बसचे तिकीट ऑनलाईन काढणे सुरु करण्यात आले आहे.
बसमध्ये तिकीट ऑनलाइन सुविधा सुरु होऊन काही दिवसच झाले आहे. पुणेकरांकडून या सुविधेला चांगलाच प्रतिसाद मिळला आहे. पुणे पीएमपीएमएल बसमध्ये एक ऑक्टोंबरपासून तिकीट युपीआयने काढण्याची सुविधा सुरु झाली. सुरुवातीला यासाठी तांत्रिक अडचणी आल्या. त्यानंतर यूपीआय यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू झाली. त्याचा लाभ अनेक प्रवासी घेत आहेत. त्यामुळे गेल्या अकरा दिवसांत ३५ हजार जणांनी ७८४ युपीआयने तिकीट काढले आहे. त्यातून ७ लाख ७३ हजार २६ रुपये मिळाले आहेत. या अकरा दिवसात २९ हजार ५२५ ट्रान्झॅक्शन झाले आहे.
बसमध्ये सुट्ट्या पैशांमुळे नेहमी वाहक आणि प्रवाशांमध्ये होत होत असतात. परंतु आता युपीआयने तिकीट सुरु झाल्यानंतर हा वाद थांबला आहे. पीएमपीएमएलच्या बसमध्ये यूपीआय यंत्रणा एक ऑक्टोंबरपासून सुरु झाली. त्यानंतर ११ दिवसांत सात लाख ७३ हजार रुपयांचे उत्पन्न ‘क्यूआर कोड’द्वारे मिळाले असल्याची माहिती पीएमपीएमएलकडून देण्यात आली.
पीएमपीएमएलची बस कुठे आहे हे आता गुगलवर समजणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने यासाठी गुगुलसोबत करार केला आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी १४ पीएमपीएमएलच्या बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहेत. त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. या चाचणीचा अहवाल आता येणार असून त्यानंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.