धक्कादायक, राज्यातील 3500 गावे संपर्क क्षेत्राबाहेर, गावांमध्ये नाही ‘या’ सुविधा

| Updated on: Jul 25, 2023 | 12:43 PM

Pune News : राज्यात नुकतीच इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. त्यावेळी या गावात संपर्क सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मदत आणि बचावकार्यावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर राज्यात हजारो गावे अशी असल्याची माहिती समोर आलीय.

धक्कादायक, राज्यातील 3500 गावे संपर्क क्षेत्राबाहेर, गावांमध्ये नाही या सुविधा
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे | 25 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीत १९ जुलै रोजी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. अजूनही शेकडो जणांचा शोध लागला नाही. शासनाने चार दिवसांनी शोध कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला. मुंबईपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शाळवाडीत मोबाईलवरून संपर्क साधणे कठीण आहे. दुर्गम भागात असलेल्या या वाडीवर दैनंदिन दळणवळणाची साधनेही नाहीत. या पार्श्वभूमीर आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इर्शाळवाडीसारखे अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी संपर्क साधता येत नाही.

3500 गावं संपर्क क्षेत्राबाहेर

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील 3500 गावे संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. दूरसंचार विभागाकडूनच ही माहिती मिळाली आहे. अनेक गावांत संपर्काची अजूनही सुविधा नाही. इर्शाळवाडीच्या घटनेनंतर संपर्क क्षेत्राबाहेर असलेल्या गावांचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. संपर्क होत नसलेल्या गावांमध्ये कोकण आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागातील गावांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी अनेक पायाभूत सुविधा तर लांब पण संपर्काचे साधन नाही. इंटरनेटची सुविधा नाही. यामुळे संपर्क होत नाही.

राज्यात मोठी संख्या तर देशात काय?

इर्शाळवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जाऊन आले. या ठिकाणी मोबाईलने संपर्क होत नसल्याचे त्यांनी मान्य केली. मग इर्शाळवाडीसारखे हजारो गावे राज्यात आहे. त्या ठिकाणी आतातरी संपर्क साधणे उभी केली गेली पाहिजे. यामुळे प्रशासन पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी संपर्क साधू शकतो. राज्यात ही संख्या मोठी असताना देशाचा विचार केल्यास त्यात मोठी भर पडेल. यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सर्व गावांपर्यंत सुविधा पोहचल्या पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये एकीकडे 5G ची सुविधा सुरु झाली आहे. दुसरीकडे अनेक गावांमध्ये संपर्क होऊ शकत नाही. शहर आणि गावांमधील पायाभूत सुविधांचे हे आंतर कसे कमी होणार? हा प्रश्न सामान्यांना आहे.