पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत (Karsankalan karyalay) मालमत्ता कराची (Property tax) थकबाकी (Arrears) असलेल्या मालमत्ता धारकांचे थकीत कर वसुलीची कारवाई सध्या जोरदार सुरू आहे. आतापर्यंत एकूण 483.52 कोटी मालमत्ता कराची वसुली झाली आहे. 106 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या आहेत तर 60 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडण्या आलेत. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता थकीत मूळ कर भरून पाणीपुरवठा खंडित होणे, मालमत्ता सील होणे, यासारखी कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन कर आकारणी व संकलन विभागाने केले आहे. करसंकलन विभागामार्फत 579 मालमत्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर 453 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊन टाळाटाळ केली, अशा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या निगडी, आकुर्डी, सांगवी, फुगेवाडी दापोडी, भोसरी. चिंचवड, थेरगाव, पिंपरी वाघेरे, पिंपरी नगर, चऱ्होली, चिखली, मोशी, तळवडे, किवळे, दिखी बोपखेल अशा 16 करसंकलन विभागीय कार्यालयातील वसुली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.