पिंपरी – शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत असताना.एक अजब तक्रार पिंपरी पोलीस आली आहे. 70 वर्षीय वृद्ध महिलेने 85वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. वृद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. या वृद्ध महिलेच्या तक्रारीनुसार महिलेचं व 85 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचे आपले प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधातून मुले जन्माला आली आहेत. मुलांची डीएनए टेस्ट केल्यानंतर हा व्यक्ती मुलांचा बाप असल्याचे समोर येईल. अशी कैफियत महिलेने पोलिसांकडे मांडत मदत मागितली आहे.
नेमकं काय घडलंय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील एका गावातून एक तरुण नोकरीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये आला. याठिकाणी एका खासगी कंपनीत त्याला नोकरी मिळाली , नोकरी करत असतानाच संबंधित तरुणाच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुढे त्याच तरुणाचे त्याच्या मेव्हणीसोबत दुसरे लग्न झाले.त्यांचा संसार सुरु झाला . दुसऱ्या पत्नी पासून त्याला सात- आठ मुले झाली. याच दरम्यान त्या तरुणाची एका तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले. त्यातून त्यांना मुलेही झाली. कालपरत्वे तो तरुण नोकरीतून निवृत्त झाला.आपल्या गावी जाऊन स्थायिक झाला. इकडे संबंधित तरुणीही आपल्या मुलांमध्ये रमली. वयानुसार दोघांच्या भेटी गाठी कमी झाल्या. दोघेही वृद्धावस्थेत आली. वयोवृद्ध पणामुळे दोघांचेही स्व कमाईचे मार्ग बंद झाले. स्वतःच्या उदर निर्वाहासाठी आर्थिक चणचण भासू लागली तेव्हा वृद्ध महिलेने त्या व्यक्तीकडे मदत मागितली. मात्र तो व्यक्तीही वृद्ध झालयाने मदत देण्यास असमर्थता दर्शवाली. यातूनच वाद निर्माण झाला व वृद्ध महिलेने पोलिसात धाव घेतली.
पोलिसांच्या समोर मोठा पेच
वृद्ध महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वृद्ध व्यक्ती सोबत संपर्क साधला. त्यावेळी ती व्यक्ती अंथरुणाला खिळलेली आढळली. आयुष्याची गजराने करण्यासाठी दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुले खर्चासाठी जे काही पैसे देतात. त्यावर गुजरण करत असल्याचे पोलिसांनी संगितले. इतकंच नव्हे तर संबंधितवृद्ध महिलेसोबत माझे संबध होत्याची कबुलीही दिली. मात्र माझ्या सद्यस्थितीत मी तिला मदत करु शकत नसल्याचेही त्याने सांगितले. एवढंच नव्हेत तर महिलेच्या डीएनए टेस्ट करण्याबाबतच्या तक्रारीवर त्यानं त्याची गरज नसून ती मुले माझी आहेत हे मी मेनी करतो. त्यामुळे त्यांनीच माझा या वृद्धापकाळात सांभाळ करावा असे म्हटले आहे. यामुळे पोलीसही चक्रावले असून, त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
NEET UG counselling : नीट यूजी समुपदेशनाला उद्यापासून सुरुवात, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर