पुण्यात लोखंडी गेट अंगावर पडल्याने 4 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

| Updated on: Aug 02, 2024 | 4:19 PM

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुर्घटनेत एका चार वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांना बाहेर एकट सोडताना काळजी घेतली पाहिजे. अशा घटनांपासून प्रत्येकाने धडा घ्यायला हवा.

पुण्यात लोखंडी गेट अंगावर पडल्याने 4 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू VIDEO
Follow us on

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.  एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, पुण्यातील दिघा परिसरात बुधवारी ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मुले परिसरात खेळताना दिसत आहेत. एक मुलगा सरकता लोखंडी गेट बंद करत असतानाच तो चिमुरडीच्या अंगावर कोसळला. इतर मुलांनी लगेच इतर रहिवाशांना माहिती देण्यासाठी धाव घेतली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घटनास्थळी येऊन जखमी मुलीला उचलताना दिसत आहे. या अपघातात गिरिजा शिंदे या चिमुकलीने आपला जीव गमवला आहे. मालकाने चुकीच्या पद्धतीने गेट लावल्याने तो स्लाइडिंग चॅनेलमधून बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे.

जगात अनेक असा घटना घडतात ज्याला आपण कुठेतरी जबाबदार असतो. त्यामुळे लहान मुलं काय करत असतात याकडे सतत लक्ष असलं पाहिजे. लहान मुलांना कुठलीही घटना घडेल याची कल्पना नसते. जर गेट व्यवस्थित राहिला असता तर आज चिमुकलीचा जीव वाचला असता.

या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर कांटा आल्याशिवाय राहणार आहे. चिमुकलीने जीव गमवल्याने लोकं हळहळ व्यक्त करत आहेत. अशा घटनांपासून आपल्याला धडा घ्यायला हवा. मुलांना कधीही एकटं बाहेर सोडू नका. मुलांच्या कृतीकडे सतत लक्ष ठेवा.