आत्तापर्यंत आपण अनेक महिला, पुरुष यांचे रॅम्प वॉक (Ramp Walk) बघितले आहेत. परंतु मावळा(Maval)त एका बैलगाडा प्रेमीनं बैलां(Bull)च्या रॅम्प वॉकची स्पर्धा भरवली होती. ही स्पर्धा ऑनलाइन (Online) पद्धतीनं असली तरी याचा बक्षीस वितरण समारंभ मात्र ऑफलाइन पद्धतीनं घेतला गेला. रुस्तम या बैलानं ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला आहे. बैलांची निवड ही त्याची चाल, शिंगं, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर केली जाणार होती. त्यानुसार रुस्तम या सगळ्या निकषांमध्ये अव्वल ठरला.
बैलगाडा शौकीनांना आनंद
राज्य सरकारनं बैलगाडा स्पर्धेवरची बंदी हटवताच बैलगाडा शौकीनांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याच आनंदात मावळात बैलांचा असा रॅम्प वॉक भरविण्यात आला. विविध ठिकाणांहून या स्पर्धेत शेतकरी, बैलगाडा शौकीन सहभागी झाले होते. प्रत्येकानंच आपले बैल चांगले सजवले होते. आपला बैल इतरांपेक्षा कसा वेगळा, भारदस्त, देखणा दिसेल याची खबरदारी मालकांनी घेतलेली दिसून आली.
‘रुस्तम’नं मारली बाजी
बैलाची चाल, शिंगं कशी आहेत, रुबाबदारपणा, वशिंड कसं आहे हे प्रामुख्यानं निकष होते. स्पर्धा काँटे की होती, असंच म्हणता येईल. याच रुस्तम नावाच्या बैलानं बाजी मारलेली दिसून आली. तो अत्यंत देखणा, भारदस्त बैल म्हणून इतरांपेक्षा वेगळा होता. त्याचे फोटो तुम्ही इथं पाहू शकता.
सर्वोच्च न्यायालयानं दिलीय परवानगी
बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला 16 डिसेंबररोजी सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं सशर्त परवानगी दिली. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत झालं. या निर्णयानंतर पुन्हा राज्यभरात बैलांच्या विविध शर्यती रंगू लागल्या. त्या आजोजित करताना नियमांचं पालनही शेतकरी करताना आढळून आले. बैलगाडा शर्यतीसह आता रॅम्प वॉकही आयोजित करण्यात आला.